Gold, silver rate update : वर्ष 2021 च्या सुरूवातीला सोन्याचे भाव 50 हजार रुपये (प्रति तोळा) पेक्षा जास्त होते. आज MCX वर सोन्याचे दर 43 हजार 300 रुपये इतकी आहे. म्हणजेच 2 महिन्यात सोन्याचे भाव 6000 रुपये ( प्रतितोळा) एवढे कमी झाले आहेत. कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे.
कोरोना काळात सोन्यात लोकांनी गुंतवणूक सुरू केली होती. लॉकडाऊनमुळे सोन्याच्या पुरवठ्यात घट झाली होती. त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला पोहचले होते. एक तोळा सोन्याचे भाव 56 हजाराच्या पार गेले होते. या भावाचा विचार केला तर, सध्या सोने 25 टक्क्यांनी उतरले आहे. म्हणजेच सोने तब्बल 12 हजाराने कमी झाले आहे.
आज चांदीच्या किंमतीत कालपेक्षा किलोमागे 480 रुपयांनी घट झाली आहे. चांदीचा आजचा दर 66,020 प्रति किलो इतका आहे. त्यामुळे अजूनही सोने - चांदी खरेदीसाठी गुंतवणूकदारांना तसेच किरकोळ खरेदीदारांना मोठी संधी आहे.