Today Gold Price : दिवाळीसाठी सोने खरेदी करताय का? मग ही बातमी वाचाच!

दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Oct 12, 2022, 09:39 AM IST
Today Gold Price : दिवाळीसाठी सोने खरेदी करताय का? मग ही बातमी वाचाच! title=

Today Gold Silver Price :  काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. या सणासाठी सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे.  अशातच आता दिवाळी अगोदर सोने चांदी (gold silver rate) खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 770 रुपयांची कमी आली असून चांदीही स्वस्त झाली आहे. Good Return या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोने  51160 रुपयांच्या दराने उघडला. तसेच, सोने 5400 रुपयांनी तर चांदी 22000 रुपयांनी स्वस्त होत आहे. (today gold silver price)

मंगळवारी (12 ऑक्टोबर) सोने 384 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 50736 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 645 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 51120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. तर चांदी 1335 रुपयांनी स्वस्त होऊन 57614 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 1899 रुपयांनी स्वस्त होऊन 58949 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

सोने 5400 आणि चांदी 22000 पर्यंत स्वस्त होतात

सोने सध्या 5464 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 22366 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची (Silver) आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.

वाचा : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, आजही राज्यात पावसाचा यलो अलर्ट

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने (Govt) एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक (customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. 

Today 22 Carat Gold Price Per Gram in Mumbai (INR)

ग्रॅम    22K               24K
1 ग्रॅम ₹4,690 ₹5,116
8 ग्रॅम ₹37,520 ₹40,928
10 ग्रॅम  ₹46,900 ₹51,160
100 ग्रॅम ₹4,69,000 ₹5,11,600