Gold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा

Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 17, 2023, 10:39 AM IST
Gold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा  title=

Gold Price: सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत आहे. अशावेळी सोने चांदी खरेदीचा मोह कोणालाही आवरत नाही. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबही थोडीशी का होईना? पण सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोनं आणि चांदीचे दर हे प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय बनले आहेत. सोन्याच्या चांदीच्या किंमतीत वाढ झाली तर अनेकांची सोने चांदीचे दागिने बनविण्याची, त्यात गुंतवणुकीची तारीख देखील पुढे जाते. दरम्यान अजूनही तुम्ही देखील अजूनही सोन्या चांदीचे दर कमी होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे. 

येत्या काही दिवसांत गणेशोत्सवासह देशभरात विविध सण सुरु होतील. त्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढू होऊ शकते. सध्या बाजारात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यात लक्षणीय घट झाली. यासोबतच गुरुवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार 840 रुपये होता तर 22 कॅरेटचा भाव 53 हजार 890 रुपये होता. 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या किमतींमध्ये गेल्या 24 तासांत लक्षणीय बदल झाला आहे.

तुमच्या शहरातील 22 ते 24 कॅरेट सोन्याचा दर 

भारताची राजधानी दिल्लीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवली जात आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,600 रुपये प्रति तोळा इतकी आहे. आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59 हजार 400 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजार 450 रुपये प्रति तोळा होता.

याशिवाय तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 57 हजार 700 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54 हजार 950 रुपये प्रति तोळा नोंदवला जात आहे. त्याचवेळी, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 400 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. यासोबतच ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 400 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54 हजार 450 रुपये होता.

असे जाणून घ्या सोन्याचे अपडेटेड दर

जर तुम्ही भारतातील सराफा बाजारातून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सर्वात आधी दराची माहिती मिळवू शकता. बाजारातील 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून 8955664433 वर मिस कॉल करा. त्यानंतर एसएमएसद्वारे तुम्हाला दराची माहिती मिळू शकते.