Gold Price Down: सात महिन्यात सोन्याला सर्वात जास्त निच्चांकी दर

सोने खरेदी करण्यासाठी  सुवर्ण संधी  

AFP | Updated: Feb 6, 2021, 06:06 PM IST
Gold Price Down: सात महिन्यात सोन्याला सर्वात जास्त निच्चांकी दर  title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव अस्थिर होते. पण 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आर्थिक बजेट सादर करताच सोन्याच्या दर जवळपास 1500 रूपयांनी खाली आहे. त्यामुळे बाजारात आणि ग्राहकांच्या तोंडावर आनंद दिसून आला. दरम्यान गेल्या 7 महिन्यात सोन्याने कमालीचा निच्चांकी दर गाठला आहे. आता सोमवारी पुन्हा बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याच्या दरांना झळाली येते की सोन्याचे दर पुन्हा घसरतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

1 फेब्रुवारीनंतर सोन्याचे दर सतत घसरत आहेत. गेल्या 7 महिन्यांमध्ये सोन्याचे दर तब्बल 2500 रूपयांनी घसरले आहे. त्यामुळे ही सोने  खरेदीसाठी सुवर्ण संधी आहे. जानेवारी महिन्यापासून सोन्याचे दर खालील प्रमाणे..

29 जानेवारी   49 हजार 830
1 फेब्रुवारी     48 हजार 745
2 फेब्रुवारी     48 हजार 537
3 फेब्रुवारी     47 हजार 976
4 फेब्रुवारी     47 हजार 544
5 फेब्रुवारी     47 हजार 380

अर्थमंत्र्यांनी सोने आणि चांदीचे आयात दर 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच सोन्याच्या दरात घसरण झाली. अर्थमंत्र्यांनी सोने आणि चांदीचे आयात दर 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच सोन्याच्या दरात घसरण झाली. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक चणचण भासत होती. 

सोन्याच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळाला. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे सोन्यात गुंतवणूक करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. मात्र आता बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे दर खाली आले आहेत. म्हणून सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचे पाय सोन्याच्या दुकानाकडे वळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.