सुखवार्ता: लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात घट

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 29, 2018, 09:06 PM IST
सुखवार्ता: लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात घट title=
File Photo

नवी दिल्ली : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

सोन्याचा दर प्रति तोळा 

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ८० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३१,१२० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घट 

सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात २०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ४०,४५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ८० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३१,१२० रुपये आणि ३०,९७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.