सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Gold Price Today :  सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जाणून घ्या 1 तोळ्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? 

श्वेता चव्हाण | Updated: May 18, 2023, 10:24 AM IST
सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? title=
gold and silver price today 18 may 2023

Gold Silver Price on 18 May 2023 : सोने खरेदी (gold rate) करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे. गेल्या महिन्यातील सर्वोच्च किंमतीपेक्षाही स्वस्तात सोने खरेदी करता येईल. त्यांना एका तोळ्यामागे मोठी बचत करता येणार आहे. या आठवड्यातील शेवटच्या दिवसात सोन्याचा भावाने (Gold Price) उसळी घेतली. तर चांदीच्या दरातील चढ-उतार सुरुच आहे. 

दरम्यान आज इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी (17 मे 2023) संध्याकाळी सोन्याचा बंद भाव 60,646 रुपये राहिला.  तर हाच दर आज (18 मे 2023) सकाळचा दर 60618 रुपये झाला होतो. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात 28 रुपयांची घट झाली आहे. मात्र सोने आज उच्चांकीवरुन 1000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यापूर्वी, 4 मे 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 61646 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. 

वाचा : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा आजच्या किमती 

सराफा तज्ञांच्या मते, जर तुम्ही लवकर सोने खरेदी केले नाही तर तुम्हाला महागाईच्या त्रासाला सामोरे जावं लागेल. व्यावसायिक आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली. येथे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 448 रुपयांनी कमी झाली आहे. 

महानगरांमधील सोन्याचे दर

सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही महानगरांचे नवीनतम दर माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,570 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,300 रुपये असेल, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,420 रुपये प्रति दहा ग्रॅम असेल. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,300 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,420 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीचा दर

याशिवाय चांदीचा दर 71808 रुपये प्रति किलोवर बुधवारी बंद झाला. सकाळी हेक्टरी दर 71739 रुपये प्रति किलो पातळीवर उघडला होता. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान चांदीचा दर 69 रुपयांनी कमी झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 71930 रुपये प्रति किलो असेल. त्यामुळेच कालच्या तुलनेत आज चांदीचा दर किलोमागे 122 रुपयांनी कमी झाला आहे.

तुमच्या शहरातील दर तपासा

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर काही वेळातच एसएमएसद्वारे दर मिळेतील. सतत अपडेट्ससाठी तुम्ही IBJA च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.