लग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट

सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 3, 2018, 07:04 PM IST
लग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट title=
Representative Image

नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

पाहा किती आहे सोन्याचा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १४० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३१,५०० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीचा दरही घसरला

सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ३२० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,५३० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

नागरिकांना दिलासा

सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.