Goa Tour Package: गो गोवा गॉन... ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान

Goa Tour Package: मस्त फिरा आणि मस्त खा.... धमाल करा. फोटोत दिसतंय तसं समुद्रकिनारी निवांत बसा... त्याआधी पाहा आयआरसीटीसीचा जबरदस्त प्लान   

सायली पाटील | Updated: Nov 29, 2023, 11:48 AM IST
Goa Tour Package: गो गोवा गॉन... ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान  title=
(छाया सौजन्य-इट्स गोवा)/ Goa Tour Package IRCTC plan latest update

IRCTC Goa Tour Package: नव्या वर्षाची चाहूल लागली की अनेकांनाच सुट्ट्यांचे वेध लागतात. नव्या ठिकाणी जाऊ, इथपासून नेहमीच्याच ठिकाणी जाऊ असे अनेक सूर आळवले जातात. या साऱ्यामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे देशातील एका लहानशा राज्याला. समुद्रकिनारी असणारं हे राज्य म्हणजे गोवा. 

महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गोव्यात दक्षिण, उत्तर भारतापासून अगदी परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते. अशा या गोव्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं झालेलाय विकास मोठ्या संख्येनं सर्वांनाच खुणावू लागला आहे. परिणामी गोव्यातील हॉटेलांचे दर आणि इथं पोहोचण्यासाठीच्या दळणवळणाच्या साधनांचे दरही चांगलेच गगनाला भिडले आहेत. त्यात गोव्यात जायचं तर Christmas आणि New Year साठीच, असाच आग्रह करणारी मंडळीही जास्त असल्यामुळं या हंगामात गोवा म्हणजे पार्टी हबच झालेलं असतं. 

पर्यटकांचा ओघ आणि त्यामुळं काही सेवांचा कमी पुरवठा होत असल्यामुळं गोव्यामधील मुक्कामासाठी बऱ्याचदा जास्तीचे पैसेही मोजावे लागतात. आता मात्र तसं होण्याची शक्यता कमी आहे. कारण, तुमची गोवा सफरीची इच्छा भारतीय रेल्वेच्या IRCTC कडून पूर्ण केली जाणार आहे. इंडियन रेलवे कॅटरिंग एंड टूरिजम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and Tourism Corporation - IRCTC) कडून आता असे काही Goa Tour Package तयार करण्यात आले आहेत ज्यामधून तुम्ही तुमच्याच पसंतीनं सहलीचे पर्याय निवडू शकता.  

Goa Tour Package ची सविस्तर माहिती... 

5 दिवस आणि 4 रात्रींसाठी असणाऱ्या आयआरसीटीसीच्या या गोवा पॅकेजमध्ये तुम्हाला लखनऊ येथून फ्लाईट मिळणार आहे. त्यामुळं उत्तर भारतातून येणाऱ्यांसाठी हे पॅकेज फायद्याचं. तुम्ही इतर कोणत्या राज्यात असाल तर IRCTC तिथूनही ही सुविधा देतं. दरम्यान, लखनऊ येथून सुरु होणाऱ्या या सहलीमध्ये विमानप्रवास, मुक्काम आणि स्थानिक ठिकाणी ये-जा करण्यासाठीची सोय आणि खाण्याची सोय असा एकूण खर्च माणसी 51000 रुपये इतका आहे. दोन व्यक्ती एकत्र प्रवास करत असल्यास हा आकडा 40500 रुपये, तर तीन जण एकत्र प्रवास करत असल्यास हा खर्च 38150 रुपयांवर जातो. या सहलीवर गेलं असता सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीसीचाही फायदा मिळणार आहे. IRCTC कडून अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : चीनची गुप्त खलबतं; अ‍ॅथलेटीक्स्च्या नावाखाली युवा पिढीला काय शिकवतायत पाहा.... 

गोव्याच्या या टूर पॅकेजअंतर्गत तुम्हाला दक्षिण गोव्यातील (South Goa) मीरामार बीच, संध्याकाळच्या वेळी मांडवी नदीवर असणाऱ्या क्रूजची सफर करता येणार आहे. तर, North Goa मध्ये बागा बीच, कण्डोलिम बीच, सिन्कवेर बीच, स्नो पार्क, बेसिलिका ऑफ बोन जीसस चर्च अशा ठिकाणांची सफर करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.