छेड काढणाऱ्या व्यक्तिला महिला वेटरने शिकवला धडा (व्हिडिओ)

व्हिडिओ: त्याला वाटले घाणेरडा स्पर्श केल्यावर ती काहीच बोलणार नाही! पण घडले भलतेच..

Updated: Jul 22, 2018, 10:05 AM IST
छेड काढणाऱ्या व्यक्तिला महिला वेटरने शिकवला धडा (व्हिडिओ) title=
प्रतिमा ट्विटर व्हिडिओमधून...

नवी दिल्ली: महिलांसोबत छेडछाडीच्या घटना केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात घडत आहेत. हे तर वास्तव आहे. पण, आज महिला विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. त्यामुळे आपल्यावर होणाऱ्य़ा अन्यायविरूद्ध त्या प्रतिक्रियाही तशाच देताना दिसतात. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका महिला वेटरसोबत एक व्यक्ती गैरवर्तन करताना दिसतो. त्याने केलेल्या गैरवर्तनावर या महिला वेटरने त्याला जागेवरच शिक्षा दिली. 

त्याने तिला घाणेरडा स्पर्श केला आणि....

सोशल मीडिया साईट रेडइटवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सांगण्यात येत आहे की, ज्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला त्याच्या चुलत बहिणीसोबत ही घटना घडली. हा व्हिडिओ हे सीसीटीव्ही फुटेज आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, पीडित युवती (महिला वेटर) हॉटेलमध्ये आपले काम करत आहे. दरम्यान, पीडितेच्या पाठीमागून जाणाऱ्या एका व्यक्तिने तिच्या पार्श्वभागाला हात लावाला. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने त्याने केलेला स्पर्श पाहून पीडिता तीव्र संतापली. प्रचंड संतापून पीडतेने या नराधम व्यक्तिला कसा धडा शिकवला हे पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा....

आरोपी विवाहीत..

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये पुढे आले की, आरोपी हा विवाहीत असून, त्याला पत्नी आणि दोन मुलेही आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी पीडितेने दिलेल्या प्रतिक्रियेचे कौतुक केले आहे.