Gautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..

Gautam Adani Wealth Loss :  शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.

Updated: Feb 7, 2023, 05:54 PM IST
Gautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं.. title=
Gautam Adani

Gautam Adani Loss After Hindenburg Report : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहावर (hindenburg report on adani) फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडालाय. अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Share Market) मोठी घसरण झाली आहे. यासोबतच अदानी ग्रुपचे शेअर्स घसरल्याचं पहायला मिळतंय. याशिवाय अदानी ग्रुपने आपल्या कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा (Adani Enterprises share) एफपीओ (FPO) रद्द केल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता अदानींच्या (Gautam Adani) साम्राज्याला उतरती कळा लागली काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (Gautam Adani lost 5.66 lakh rupees every second in the last 150 days find out how latest marathi news)

चार महिन्यांपूर्वी गौतम अदानी यांची संपत्ती (Gautam Adani Wealth) जवळपास 150 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. त्यावेळी त्यांनी जेफ बेजोस (jeff bezos) यांना मागे टाकलं आणि तिसऱ्या स्थानावर मोठी झेप घेतलीये. त्यामुळे अदानींच्या संपत्तीचं आकलन तुम्हाला झालं असेल. मात्र, गेल्या 150 दिवसात चित्र पालटलं. अदानींचे ग्रह फिरले अन् त्यांच्या संपत्तीमध्ये घट होण्याचा सिलसिला सुरूच राहिलाय.

अदानींनी सेकंदाला गमावले 5.66 लाख

अदानींची आजपर्यंतची सर्वाधिक कमाई ही 150 अब्ल डॉलर इतकी राहिलीये. भारतीय भाषेत सांगायचं झालं तर 12.33 लाख कोटी रुपये अदानींकडे होते. त्यामुळे ते आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत (Richest in Asia) व्यक्ती बनले होते. पहिल्यांदाच कोणा एका व्यक्तीने 150 चा आकडा गाठला होता. त्यानंतर आता त्यांच्या अदानींची पडझड सुरू झाली आहे. त्यानंतर आता अदानींचा संपत्ती 59 अब्ज डॉलर्सवर आली आहे.

आणखी वाचा - Adani Group: गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार? SEBI चं सुचक वक्तव्य!

आकड्यांच्या हिशोबाने पाहिलं तर, 150 दिवसात अदानींच्या संपत्तीत 91 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय. त्यानुसार अदानींना दर सेकंदाला 5.66 लाखांचं नुकसान झालं आहे. बजेटनंतर अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअर्समध्ये वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यानंतर देखील एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये तब्बल 25 टक्क्यांची मोठी घट झाल्याचं दिसून येतंय.

गुंतवणूकदारांचं नुकसान झाल्यानंतर आरबीआय (RBI) संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे बाजारात आर्थिक स्थर्य राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही सेबीने म्हटलं आहे. त्याचबरोबर आरबीआयने देखील बँकांकडून अहवाल मागवलाय. त्यामुळे आता गौतम अदानींवर कारवाई होणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे.