Gas Cylinder Price Hike: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर आज पुन्हा महागलाय. व्यावसायिक वापराचा 19.5 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आलेत. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर महागल्याने आता मुंबईत 19.5 किलोंचा निळा सिलेंडर 1721 रुपयांना मिळेल. जुलै 2022 नंतर घरगुती गॅसच्या किंमती वाढलेल्या नाहीत.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. आजपासून सिलिंडर घेणे महाग झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबईपासून पाटणापर्यंत सर्वच शहरांमध्ये गॅस सिलिंडर खरेदी करणे महाग झाले आहे. कोणत्या शहरात सिलिंडरचे दर काय आहेत ते सांगू.
1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही कायम आहेत. म्हणजेच, घरगुती सिलिंडरसाठी, तुम्हाला मागील महिन्यात जितका खर्च केला होता तितकाच खर्च करावा लागेल. त्याच वेळी, व्यावसायिक सिलिंडरसाठी 25 रुपये अधिक खर्च केले जातील.
- दिल्ली - 1769
- मुंबई - 1721
- कोलकाता - 1870
- चेन्नई - 1917
- दिल्ली - 1053
- मुंबई - 1052.5
- कोलकाता - 1079
- चेन्नई - 1068.5
गेल्या एका वर्षात सिलिंडर 153.5रुपयांनी महागला आहे. म्हणजेच 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमती 6 जुलै 2022 रोजी बदलण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 153.5 रुपयांनी वाढल्या आहेत.
2022 मध्ये मार्च महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या. नंतर मे महिन्यात पुन्हा 50 रुपयांनी भाव वाढविण्यात आले. त्याचवेळी मे महिन्यात दुसऱ्यांदा 3.50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये शेवटच्या वेळी दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.