Petrol Diesel Price on 15 March 2023 : आज बुधवारी (15 मार्च) सकाळी अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rates) किमती वाढवल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel rates) किरकोळ किमतीत वाढ झाली आहे. दरम्यान डब्ल्यूटीआय (WTI Crude Oil) कच्च्या तेलात 0.86 टक्क्यांच्या वाढीनंतर हे प्रति बॅरल 71.94 डॉलरवर व्यापार करीत आहे. त्याच वेळी, ब्रेंट कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.68 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर ते प्रति बॅरल $ 77.98 डॉलरवर व्यापार करीत आहे.
चेन्नईमध्ये आज पेट्रोल 11 पैसे आणि डिझेल 9 पैसे प्रति लीटर महाग होऊन 102.74 रुपये आणि 94.33 रुपयांनी प्रति लिटर डिझेल विकले जात आहे. तर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोल 17 पैसे आणि डिझेल 17 पैसे महाग होऊन 96.76 प्रति लीटर आणि 89.93 प्रति लीटर विकले जात आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल 10 पैसे महाग होऊन 96.57 रुपये आणि 89.76 रुपये लीटरने डिझेल विकले जात आहे. त्याच वेळी पेट्रोल जयपूरमध्ये 98 पैस आणि डिझेल 90 पैसे स्वस्त होऊन 108.41 रुपये आणि 93.65 रुपयांनी डिझेल विकले जात आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.