Todays Panchang : आज कशी असेल ग्रहांची चाल? एकदा पाहूनच घ्या पंचांग

Todays Panchang : हिंदू पंचांगाची आणखी एक ओळख म्हणजे वेदिक पंचांग. जिथं काळ आणि वेळेची गणना केलेली असते. प्रत्येत तिथी आणि वारानुसार यात योगांचीही माहिती दिलेली असते.   

Updated: Mar 15, 2023, 06:45 AM IST
Todays Panchang : आज कशी असेल ग्रहांची चाल? एकदा पाहूनच घ्या पंचांग  title=
15 march 2023 wednesday todays panchang mahurat astro news in marathi

Todays Panchang : ज्योतिषविद्येमध्ये पंचांगाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. घरात एखादं शुभकार्य असो किंवा मग एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा बेत आखणं असो. पंचांगाच्या माध्यमातून चित्र बरंच स्पष्ट होतं. किंबहुना अनेकजण या पंचांगाच्याच आधारे शुभकार्याच्या वेळा निर्धारित करतात. अशा या पंचांगानुसार आज बुधवार, कृष्ण पक्षातील अष्टमी. 

तुम्ही जितकं महत्त्वं राशीभविष्याला देता तितकंच दैनंदिन पंचांगालाही देत चला. जिथून तुम्हाला अशुभ काळ, शुभ योग या साऱ्याचीच माहिती मिळून साधारण ग्रहांच्या स्थितीबाबतही कल्पना येऊ शकेल. चला तर, पाहूया आजचं पंचांग. (15 march 2023 wednesday todays panchang mahurat astro news in marathi )

आजचा वार - बुधवार    

तिथी- अष्टमी

नक्षत्र - ज्येष्ठा, मूळ 

योग - सिद्धी 

करण- बालव

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:31 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.29 वाजता

चंद्रोदय -  दुपारी 02.18 वाजता  

चंद्रास्त - सकाळी 11:28 वाजता  

चंद्र रास- वृश्चिक    

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 12:06:31 पासुन 12:54:22 पर्यंत

कुलिक– 12:06:31 पासुन 12:54:22 पर्यंत

कंटक– 16:53:36 पासुन 17:41:27 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 15 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत सतर्क राहावं!

 

राहु काळ– 12:30:27 पासुन 14:00:09 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम– 07:19:26 पासुन 08:07:17 पर्यंत

यमघण्ट–08:55:08 पासुन 09:42:59 पर्यंत

यमगण्ड– 08:01:18 पासुन 09:31:01 पर्यंत

गुलिक काळ–  11:00:44 पासुन 12:30:27 पर्यंत

 

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - आज मुहूर्त नाही 

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती, अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ

चंद्रबल- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)