या मुलीने दिड वर्षात उभारला २५ कोटींचा व्यवसाय

साठी आणि इतरांसाठी नवीन काम आणत आहेत.  भारताची डिजिटल गोष्टीकडे वाटचाल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु  काही लोक अजूनही असंख्य जणांना पारंपरिक पद्धतीनेच खरेदी करायला आवडते. लोकांची आवड ओळखून एका तरुणीने दिड वर्षात २५ कोटींचा व्यवसाय उभारला आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 5, 2017, 11:52 PM IST
या मुलीने दिड वर्षात उभारला २५ कोटींचा व्यवसाय title=

आजच्या तारखेला महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. महिला उद्योजक स्वत: साठी आणि इतरांसाठी नवीन काम आणत आहेत.  भारताची डिजिटल गोष्टीकडे वाटचाल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु  काही लोक अजूनही असंख्य जणांना पारंपरिक पद्धतीनेच खरेदी करायला आवडते. लोकांची आवड ओळखून एका तरुणीने दिड वर्षात २५ कोटींचा व्यवसाय उभारला आहे.

 शांभवी नावाच्या २५ वर्षाच्या तरुणीने शॉपमेट.इन नावाचे ऑनलाईन पोर्टल तयार केले आहे, जिथे तुम्ही उत्पादने खरेदी करु शकता. तिने स्वत: व्यवसाय उभा करत इतर महिला उद्योजकांसाठी काम मिळवून देत आहे. शांभवी सिन्हाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये प्रोडक्ट बुकिंग ऑनलाइन तर होतेच. त्याचसोबत ग्राहक  जवळच्या दुकानातून वस्तू खरेदी शकतात.

या वेबसाईटवर तुम्ही कोणत्याही प्रोडक्टच्या सर्वोत्तम किंमती जाणून घेत ऑनलाइन व्यवहार करू शकता आणि आपल्या जवळच्या दुकानातून विकत घेऊ शकता. शांभवीने याद्वारे अनेकांना रोजगार पुरवला आहे. त्यांच्या कंपनीत ८ लोक काम करतात. डिसेंबर २०१५ मध्ये १ कोटी रुपये गुंतवून सिन्हाने कंपनीला सुरुवात केली होती.

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक, आयटी, बाइक, लॅपटॉप, टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशिन आणि कार यांसारख्या इलेक्ट्रॉनिक बाबी बुक केल्या जातात शांभवी सिन्हा या व्यवसायातून केवळ १-२ टक्के कमिशन कमावते.  दिल्ली, गुड़गांव, फरीदाबाद, गाझियाबाद आणि नोएडा येथे हीच्या कंपनी आहेत. भविष्यात, इतर शहरांमध्ये कंपन्यांचे विस्तार करण्याची तिची इच्छा आहे.