नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader )आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंह (Former Union Home Minister Sardar Buta Singh) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंह ( Sardar Buta Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बुटासिंह हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. बुटा सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाचे दिग्गज दलित नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते बर्याच दिवसांपासून आजारी होते. सुमारे तीन महिन्यांपूर्वीच त्यांना एम्समध्ये दाखल केले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबातील दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग हे चार वेळा जलोरमधून खासदार राहिले आहेत. राज्यभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेल्या बूटा सिंह यांनी काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मोठी पदे भूषविली. रेल्वेमंत्र्यांपासून गृहमंत्री, तसेच कृषिमंत्री आणि बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष यांनी महत्त्वपूर्ण विभाग हाताळले. बुटा सिंह आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले. नेहरू-गांधी घराण्याचे विश्वासू सरदार बूटा सिंह यांचे निधन हे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान आहे.
आज जेव्हा काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे, अशावेळी पक्षाच्या सर्वात ज्येष्ठ दलित नेत्याची मोठी उणीव जाणवणार आहे. बुटा सिंह यांनी 70-80 च्या दशकात काँग्रेस पक्षाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते.