नवी दिल्ली : संपूर्ण देशामध्ये कोरोना लसीकरणाची (Coronavirus Vaccine) ड्राय रन सुरू झाली आहे. (Dry Run) कोरोना लसीकरणाची ड्राय रन प्रत्येक राज्याच्या राजधानीत होत आहे. कोरोनाव्हायरस लस ( Coronavirus Vaccine) राज्यांच्या शेवटच्या भागापर्यंत नेणे हे उद्दीष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक केंद्रात 25 जणांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देशात मोफत कोरोनाची लस देणार असल्याचे जाहीर केले आहे.
देशभरात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या(Coronavirus Vaccine) ड्रायरनला (Dry Run) सुरुवात झाला आहे. यानिमित्त तीन राज्य वगळता सर्व राज्यांच्या राजधानी असलेल्या शहरात लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येत आहे. यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन (Health Minister Harsh Vardhan) यांनी दिल्लीतील जीटीबी हॉस्पीटल इथल्या लसीकरण केंद्रावर जाऊन ड्राय रनची (Dry Run)पाहणी केली.
कोरोनाची लस केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशातील कोरोना योद्धा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत असेल असे मोठे वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. कोरोना लसीच्या ड्रायरनची पाहणी आज केंद्रीय मंत्र्यांनी केली.(Health Minister Harsh Vardhan) त्यावेळी दिल्लीत कोरोना लस मोफत आहे. देशात इतरत्र काय किंमत असेल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत असेल, असे वक्तव्य केले आहे. दरम्यान यासंदर्भात आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
मोठी बातमी । देशात मोफत कोरोना लस देणार https://t.co/KKwVjn7TCs
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 2, 2021
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने आज कोरोनाव्हायरस लस (Vaccine) मोफत देण्याची मोठी घोषणा केली. केंद्र सरकारच्यावतीने असे सांगण्यात आले की, कोरोना व्हायरस लस संपूर्ण देशात विनामूल्य देण्यात दिली जाईल.
आजपासून कोरोनाव्हायरस ड्राय रनला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. ड्राय रनसाठी केंद्रे देशाच्या वेगवेगळ्या राज्यात स्थापण करण्यात आली आहेत. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी ड्राय रनसाठी सहभागी होत आहेत. ड्राय रनच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात 28-29 डिसेंबर 2020 रोजी झाली. पहिला टप्पा आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब येथे सुरू झाला.
विशेष म्हणजे कोरोना लसीशी संबंधित ही मोहीम आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. देशातील 116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रांवर ड्राय रन सुरु आहे. दरम्यान, आरोग्य सेवा कामगारांना प्रथम लसीकरण केले जात आहे. दिल्लीमध्येही कोरोना लस विनामूल्य देण्यात येणार आहे. दररोज 1 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनी दिली. प्रथम आरोग्य सेवा कामगारांना कोरोना लस दिली जाईल.