धक्कादायक! माजी नगरसेवकाने महिलेला लाथेने तुडवले, पक्षातून हकालपट्टी

माजी नगरसेवकांने महिलेला लाथेने मारहाण केली. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Sep 13, 2018, 07:01 PM IST
धक्कादायक! माजी नगरसेवकाने महिलेला लाथेने तुडवले, पक्षातून हकालपट्टी title=

पेरामंबूर : एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी नगरसेवकांने महिलेला लाथेने मारहाण केली. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

महिलेला मारहाण करणाऱ्या माजी नगरसेवकाचे नाव सेल्वकुमार असे आहे. तो दिवंगत नेते करुणानिधी यांच्या डीएमके पक्षाचा नगरसेवक होता. २५ मार्चला झालेला हा प्रकार असून सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले आहे.

ही घटना एका ब्युटी पार्लरमधील आहे. माजलेला माजी नगरसेवक सेल्वकुमार महिलेला शिवीगाळी करत होता. त्यानंतर लाथानी मारहाण करताना दिसतोय. दरम्यान, यावेळी उपस्थित महिला त्याला असं करु नका, असे सांगताना दिसत आहेत. मात्र, तो महिलेला लाथा मारताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सेल्वकुमारला अटक करण्यात आली आहे. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेय.