भारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

भारतात ट्रॅफिकची समस्या ही सामान्य बाब आहे. या समस्यांना एक परदेशी महिला सामोरी गेली आहे. या सगळ्यावर तिचं काय म्हणणं आहे जाणून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 28, 2024, 01:27 PM IST
भारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल  title=

भारतात अनेक परदेशी पाहुणे भारत अनुभवायला येतात. भारतामध्ये प्रवास करताना त्यांना ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जावे लागते. भारतातील ट्रॅफिकची समस्या ही अतिशय सामान्य आहे. ट्र‌ॅफिकचे नियम नीट पालन न केल्यामुळे या समस्या जाणवतात. या सगळ्यावर एका परदेशी महिलेने व्हिडीओ केलाय जो प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हल्लीच पश्चिम बंगालमध्ये एक विदेशी महिला आणि तिचा जोडीदार रस्ता ओलांडताना दिसत आहे. महिलेला रस्ता क्रॉस करताना अनेक अडचणी येत आहे. यावेळी तिने व्हि़डिओ बनवला आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. 

या व्हिडीओमद्ये कपल रस्ता ओलांडताना दिसत आहे. भरधाव गाड्या आणि सततची गाड्यांची रिघ यामुळे तिला रस्ता क्रॉस करता येत नाही. अशावेळी तिने वापरलेली ट्रिक देखील तितकिच महत्त्वाची ठरली आहे. 

महिलेचा व्हिडीओ 

रस्ता क्रॉस करणाऱ्या समस्येमध्ये महिलेने एक मजेदार व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये ती सांगते की, 'सुपर पावर मिळवण्यासाठी मला अजून किती दिवस भारतात राहावं लागेल हा प्रश्न आहे. ज्या सुपर पावरच्या मदतीने मी ट्रॅफिक थांबवू शकते. माझ्याकडे सुपर पावर असती तर...' हा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

रस्ता ओलांडताना आली अडचण 

व्हिडिओमध्ये दोघेही रस्त्याच्या मधोमध उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाहने इतक्या वेगाने येत आहेत की त्यांना लगेच रस्ता ओलांडता येत नाही. मग लैला म्हणते - "मला भारतात किती वर्षे राहावे लागेल, जेणेकरून मला ही महासत्ता मिळावी की मी रहदारी थांबवू शकेन आणि आरामात रस्ता ओलांडू शकेन!" ती रस्ता ओलांडते, परंतु लोकांना ही गोष्ट मनोरंजक वाटते, ज्यानंतर ते आनंद घेऊ लागतात.

हा व्हिडीओ @Guru_laila या इंस्टाग्राम पोस्टवर पोस्ट करण्यात आला आहे. गुरु आणि लैला एक परदेशी कपल आहे जे भारतात राहतात. बंगालमध्ये राहून हे दोघं भारतातील सुंदर पर्यटन स्थळांना भेट देतात. हल्लीच हा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हे दोघं पश्चिम बंगालमध्ये फिरताना दिसत आहे.