देशातील 'या' भागात flavoured condoms चा लक्षणीय खप; कारण असं ज्याचा विचारही करणं अशक्य

हा खप एकाएकी का वाढला यामागचं कारणंही तितकंच अनपेक्षित. 

Updated: Jul 25, 2022, 03:29 PM IST
देशातील 'या' भागात flavoured condoms चा लक्षणीय खप; कारण असं ज्याचा विचारही करणं अशक्य  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली : नुकतीच एक अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. कारण एका अनपेक्षित कारणामुळं या भागात अचानकच flavoured condoms ची मागणी वाढल्याची माहिती समोर आली आहे. बरं, हा खप एकाएकी का वाढला यामागचं कारणंही तितकंच अनपेक्षित. 

पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये flavoured condoms ची मागणी इतकी वाढली आहे, की स्थानिक दुकानंही ही मागणी पूर्ण करु शकत नाहीत. या मागणीच्या आधारे तपास करुन पाहिलं असता, धक्कादायक बाब समोर आली. 

सदर भागातील तरुण कंडोमच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत आहेत. किळस वाटेल पण हे खरंय. सुरक्षित शरीरसंबंधांसाठी वापरात आणलं जाणारं कंडोम दुर्गापूरमधील काही तरुण नशा करण्यासाठी वापरत आहेत. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार इथले बरेच तरुण या हादरवणाऱ्या नशेच्या आहारी गेले आहेत. 

कंडोम गरम पाण्यात ठेवून त्यानंतर तरुण गरम पाणी पित आहेत. यामुळं होणारा नशा 10-12 तासांपर्यंत टिकतो असंही म्हटलं जात आहे. दुर्गापूर सिटी सेंटर, बिधाननगर, बेनाचिटी, मुचिपारा, सी जोन आणि ए झोन अशा भागांत flavoured condoms ची मागणी वाढली आहे. 

कंडोमचे कम्पाऊंड्स अल्कोहोलमध्ये बदलतात 
कंडोममध्ये असणाऱ्या सुगंधित पदार्थांना गरम केलं असता त्यांचं रुपांतर अल्कोहोलमध्ये होतं. कोणीही हे मिश्रण प्यायल्यास त्यांना याचं व्यसन लागतं. अशा पद्धतीची सुगंधीत द्रव्य डेंड्राइटमध्येही आढळतात. ज्या कारणास्तव अनेकजण याचाही वापर नशा करण्यासाठी करतात.