नवी दिल्ली : भारत अजूनही २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक सुधारणा सुरूच राहतील पण राज्यांनीही गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करावे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी 'इकॉनॉमिक टाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा विश्वास व्यक्त केला. कोरोना व्हायरस संकटात किती जीव वाचवण्यात आपण यशस्वी ठरलो, यावर मोहिमेचं यशापयश मोजले जावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. परकीय गुंतवणुकात १३टक्के वाढ झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पीएम मोदी म्हणाले की, भारतात कृषी, एफडीआय, उत्पादन आणि वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे. ईपीएफओमध्ये सहभागी होणारे अधिक लोक नोकर्या देखील वाढल्या असल्याचे दर्शवित आहेत. भारताची अर्थव्यवस्था सावरण्याच्या मार्गावर आहे. कृषी आणि कामगार क्षेत्रात सुधारणेबाबत मोदी म्हणाले की, आता भारतातील जागतिक गुंतवणूकदारांकडून मोठा संकेत मिळाला आहे. नवीन कामगार कायदे मालक आणि नोकरदार दोघांनाही कसे उपयोगी पडतात या विषयावर त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले.
बिहार निवडणुकीत भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करताना मोफत लस देण्याची घोषणा केली होती. त्यावरुन विरोधकांकडून भाजपला घेरण्यात आले होते. देशात लोक राहत नाहीत का, असा सवाल केला होता. कोरोना 'लस'वरुन राजकारण होत असल्याचे लक्षात आल्याने भाजपने सावध भूमिका घेतली. आता मोदींनी कोरोना लस येईल तेव्हा ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. सध्याच्या बदलत्या स्थितीतही जगभरात 'न्यू इंडीया' व्हिजनची संकल्पना देशासमोर ठेवली. मोदींनी टीकाकारांच्या प्रश्नांना यावेळी उत्तर दिले. सरकारला केवळ विरोध करायचाय ते काहीही बोलत राहतात. व्हॅक्सिन जेव्हा येईल तेव्हा प्रत्येकाला दिले जाईल, असे ते म्हणाले.