गुजरात नाहीतर 'या' राज्यात होणार पहिली Lion Safari... जाणून घ्या!

लायन सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की वाचा ही बातमी!

पोपट पिटेकर | Updated: Nov 5, 2022, 11:47 PM IST
गुजरात नाहीतर 'या' राज्यात होणार पहिली Lion Safari... जाणून घ्या! title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : देशातील पश्चिम बंगाल हे लायन सफारी (Lion Safari West Bengal) सुरू करणार पहिलं राज्य (West Bengal First state) असणार आहे. सिलीगुडी, उत्तर बंगालमधील नॉर्थ बंगाल वाइल्ड अॅनिमल पार्क (North Bengal Wild Animal Park in Siliguri, North Bengal) 2016 मध्ये सुरू करण्यात आले आणि पार्कमध्ये आता सुमारे 11 वाघ (Tiger) आणि शाकाहारी सफारी असलेली टायगर सफारी (Tiger Safari) आहेत.  टायगर सफारी 20 हेक्टरमध्ये (Tiger Safari in 20 hectares) पसरलेली आहे. लायन सफारीचा मास्टर प्लॅन (Lion Safari Master Plan) आधीच तयार करण्यात आल्याचंही कळतंय. 

सफारी 20 हेक्टरमध्ये असणार 
राज्याला सफारीसाठी सिंह आणि सिंहिणीच्या किमान दोन जोड्या (At least two pairs of lions and lionesses) आणायच्या आहेत. ही सफारी 20 हेक्टरवर (hectares) पसरली आहे. खास तयार केलेल्या 20 आसनी मिनी बसेस  (Mini buses) या उद्यानात पर्यटकांना (Tourists in the park) घेऊन जाणार आहे. आतापर्यंत टायगर सफारीमध्ये सुमारे 11 वाघ आहेत. 2019 पासून, उद्यानात 11 वाघांचे शावक (tiger cubs) जन्माला आले आहेत, परंतु त्यापैकी दोन जन्मानंतर लगेचच आरोग्याशी संबंधित आजारांमुळे मरण पावली.

व्याघ्र प्रजनन आणि संवर्धन केंद्र 
या उद्यानात व्याघ्र प्रजनन आणि संवर्धन केंद्र (Tiger Breeding and Conservation Centre) सुरूही होणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावही लवकरच सीझेडएकडे पाठवण्यात येणार आहे. उत्तर बंगालच्या (North Bengal)अलीपुरद्वार जिल्ह्यातील बक्सा व्याघ्र प्रकल्पात (Baxa Tiger Reserve) आणि शेजारच्या कूचबिहार जिल्ह्यातील पातालखवा येथे एक शिंगे असलेला गेंडा वाघांना पुन्हा आणण्याच्या प्रयत्न वन विभाग काम करणार आहे.