प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक

दोन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय

Updated: Jan 14, 2019, 01:45 PM IST
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक title=

नवी दिल्ली : संगम नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यात सोमवारी आगीची घटना समोर आलीय. या आगीनं दिगंबर आखाडा आणि त्याच्या आजूबाजूच्या तंबूनाही आपल्या ज्वालांमध्ये घेरलं. कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी जमली असताना ही आग तेजीत पसरत चालली होती. परंतु, अग्निशमन दलानं तातडीनं हालचाल करत वेळीच आग आटोक्यात आणलीय. स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शिंनी म्हटलं. घटनेदरम्यान अनेकांनी सिलिंडर स्फोटाचे आवाज ऐकल्याचंही सांगितलं.

घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुंभमेळ्याच्या निमित्तानं जमलेले साधू-संत आणि इतर लोक सुरक्षित आहेत. प्रशासनानं लोकांना शांतीचं आवाहन केलंय.  

पोलीस अधिक्षकांनी (कुंभमेळा सुरक्षा) दिलेल्या माहितीनुसार, आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवण्यात यश आलं. नेमकी ही आग का लागली? याबद्दल चौकशी सुरू आहे. 

या आगीनं दिगंबर आखाड्याला सर्वात जास्त नुकसान झालं. उद्यापासून शाही स्नानानं कुंभमेळ्याची सुरूवात होणार आहे.