Optical Illusion Quiz: पाऊस पडतोय, फोटोत लपलेली छत्री शोधा; ट्राय करा, 10 सेकंदात सापडतेय का पाहा

 Optical Illusion Quiz इमेज तुम्हाला विचार करायला भाग पडतात. नजर तीक्ष्ण असणारे हा गेम सहज खेळतात. 

Updated: Jan 29, 2023, 06:46 PM IST
Optical Illusion Quiz: पाऊस पडतोय, फोटोत लपलेली छत्री शोधा; ट्राय करा, 10 सेकंदात सापडतेय का पाहा title=

Optical Illusion Quiz Find The Umbrella : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्विझ व्हायरल होत आहेत. Optical Illusion Quiz  सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत. हा खेळ चित्रात दडलेला असतो. तीक्ष्ण नजर असणारे या क्वीज सहज सोडवतात. हे गेम डोकं लावायला भाग पडतात. आता असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत  कुठेतरी छत्री लपली आहे (Find The Umbrella). ही छत्री दहा सेकंदात शोधण्याचे चॅलेंज आहे. 

या फोटोमध्ये नेमकं आहे?

हा फोटो एक कार्टून इमेज आहे. यात एक ग्रुप डोंगरावर ट्रेकिंग करायला आला आहे. या फोटोत दोन मुली आणि एक मुलगा आहे. फोटे मध्ये हे तिघेजण एका डोंगरावर थांबल्याचे दिसत आहे. या डोंगरावर घटनदाट जंगल आहे. यात खूप झाडे दिसत आहेत. झाडांवर खारु ताई दिसत आहे. तसेच या फोटोत झाडावर बसलेले अनेक पक्षी दिसत आहेत. घुबड, चिमणी, कबूतर, कावळा यासरखे अनेक पक्षी आहेत. फोटोत पक्षांसह अनेक प्राणी देखील दिसत आहेत.  ट्रेकिंगसाठी आलेले हे तिघेजण निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, अचानक पाऊस सुरु होतो आणि या तिघांची पळापळ होते. पावसापासून बचाव करण्यासाठी हे मुले छत्रीचा आधार घेण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांना छत्री  सापडतच नाही. एक मुलगी आपल्या बॅगेत छत्री शोधू लागते तिची मैत्रिण तिला मदत करताना दिसकत आहे. खूप वेळ शोधाशोध करुनही यांना छत्री सापडलेली नाही. 

छत्री कुठे आहे?

ज्यांच डोक फास्ट आणि नजर तेज आहे त्यांनी ही छत्री दहा सेकंदाच्या आतच शोधून दाखवली आहे. मात्र, अनेक जण असे आहेत की अनेकदा नजर फिरवूनही त्यांना छत्री सापडलेली नाही. या फोटोत घनदाट जंगल आहे. या मुलांनी जंगलात फिरता फिरता छत्री एका झाडाजवळ ठेवली होती आणि ते विसरुन गेले. मात्र, आता ते छत्री शोधून शोधून दमले आहेत. आकाशी रंगाची दूरवरची झाडे आणि मोकळ्या आकाशात डोळ्यांना सहज दिसत नाही. या मुलांच्या पाठीमागे एक मोठ झाड आहे. या झाडालाच मुलांनी छत्री उभी केली आहे.