FIFA World Cup 2022 SBI Passbook Viral: सोशल मीडियावर फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यापैकी कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना एकीकडे एसबीआयचं पासबूक व्हायरल होत आहे. एसबीआय पासबूक ट्रेंड होण्यामागचं कारण अनेकांना माहिती नाही. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स सामन्याचा एसबीआय पासबूकशी काय संबंध? असा प्रश्न पडला आहे. जर तुम्हालाही हे कोडं पडलं असेल तर आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगतो.
अर्जेंटिनाची जर्सीचा रंग एसबीआयच्या पासबूकशी मिळताजुळता आहे. अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक मारताच एसबीआय पासबूक ट्रेंड होऊ लागलं. त्यानंतर काही युजर्संनी यावर मीम्स शेअर केले आहेत. युजर्संनी एसबीआय पासबूकचे काही फोटो शेअर करत मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Reason why Indians are biggest fan of Argentina
SBI official partner of Argentina pic.twitter.com/72pXshY649— Deep4IND (@Deep4_IND) December 15, 2022
SBI's lunch time = Argentina's Whole Match https://t.co/u2kt12FyRX
— Harshad (@_anxious_one) December 15, 2022
Reason why Indians support Argentina
Indians feel if Argentina loose they will loose all their money #India #FIFAWorldCup #GOAT #FIFAWorldCupQatar2022 #WorldCup2022 #WorldCup #finale #mumbai #Delhi #Kerala #TamilNadu #Karnataka #Bengaluru #SBI #Bank pic.twitter.com/CTi7TW5X3Y
— We want United India (@_IndiaIndia) December 15, 2022
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मेस्सी महान खेळाडूंच्या यादीत बसतो. पेले, मॅराडोना आणि पोर्तुगालच्या ख्रिस्तियाने रोनाल्डोच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. पण संपूर्ण कारकिर्दीत मेस्सीच्या खात्यात वर्ल्डकपची नोंद नाही. 2014 मध्ये ही संधी आली होती. मात्र जर्मनीकडून पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये विश्वचषकावर नाव कोरलं होतं. आता क्रीडाप्रेमी हा वर्ल्डकप अर्जेंटिनाने जिंकावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
बातमी वाचा- FIFA WC 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
साखळी फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे होते. अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला. या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 ने पराभव सहन करावा लागला. या निकालामुळे मेस्सीचं स्वप्न भंगणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. मात्र त्यानंतर मेस्सीच्या संघानं जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा 2-0 ने पराभव केला. त्यानंतर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात पोलंडला 2-0 मात देत सुपर 16 बाद फेरीत स्थान मिळवलं. सुपर 16 फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धुळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्या अतितटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी 90 मिनिटं आणि एक्स्ट्रा टाईमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. त्यानंतर निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. हा सामना अर्जेंटिनाने 3-4 ने जिंकला. उपांत्य फेरीत क्रोएशिया विरुध्द अर्जेंटिना या सामन्यात अर्जेंटिना 3-0 ने मात मिळवली. अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. वर्ल्डकप इतिहासात अर्जेंटिनाने उपांत्य फेरीतील विजयी घोडदौड कायम ठेवली.