वडिलांनी पोस्टमॉर्टम करण्यासाठी आपल्या मुलाच्या मृतदेहाला 17 दिवस ठेवले फ्रीजमध्ये... पण का?

 परंतु त्यांनी असे का केलं असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. खरेतर..

Updated: Aug 18, 2021, 10:24 AM IST
वडिलांनी पोस्टमॉर्टम करण्यासाठी आपल्या मुलाच्या मृतदेहाला 17 दिवस ठेवले फ्रीजमध्ये... पण का? title=

मुंबई : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका वडिलांनी पोस्टमॉर्टम करण्यासाठी आपल्या मुलाच्या मृत शरीराला फ्रीजमध्ये ठेवले. त्यांनी त्याच्या मुलाच्या शरीरारला चक्कं 17 दिवसांपासून फ्रीजमध्ये ठेवले आहे. परंतु त्यांनी असे का केलं असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. खरेतर उत्तर प्रदेशाच्या सुल्तानपूरमध्ये शिवप्रसाद पाठक यांनी आपल्या मुलाच्या मृतदेहाला गेल्या 17 दिवसांपासून फ्रीजरमध्ये ठेवले आहे कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या शरीरीचे पुन्हा एकदा शवविच्छेदन करायचे होते ज्यासाठी त्यांनी हे सगळं केलं

नक्की काय प्रकरण आहे?

हे प्रकरण जिल्ह्यातील कुरेभर पोलीस स्टेशन परिसरातील सुभेदार पूर्वा गावातील आहे. येथील शिवप्रसाद पाठक यांचा मुलगा शिवांक पाठक त्यांचा मित्र वरुण वर्मासोबत दिल्लीत खासगी कंपनी चालवायचा. दरम्यान, शिवांक कंपनीमध्ये एचआर म्हणून काम करणाऱ्या गुरलीन कौरशी मैत्री केली. वर्ष 2013 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर दोघांनाही एक मुलगी झाली.

कुटुंबात सर्व काही ठीक चालले होते आणि जोडपे खूप आनंदी होते. पण 1 ऑगस्ट 2021 रोजी शिवंकचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पत्नीने शिवांकचे शवविच्छेदन दिल्लीतच केले आणि कुटुंबालाही माहित नव्हते. जेव्हा मृताचा मित्र वरुणने शिवांकच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूबद्दल सांगितले. तेव्हा सर्वांना धक्का बसला.

परंतु या कुटुंबाला मुलाच्या मृत्यूबद्दल संशय निर्माण झाला, ज्यामुळे त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली. परंतु पोलीस त्यांचे ऐकत नसल्याचे आणि तक्रात दाखल करुन घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यानंतर शिवप्रसाद पाठक आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन सुलतानपूरला आले. आपली सून गुरलीन कौर हिने आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप करत, त्यांनी मुलाचा मृतदेह पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. यासाठी यूपी पोलिसांची मदत न मिळाल्याने वडिलांनी आता न्यायालयाचा सहारा घेतला आहे.

न्यायालयाच्या आदेशावरून आपल्या मुलाच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन होईल आणि सत्य बाहेर येईल अशी त्याला आशा आहे.

शिवंकचे शवविच्छेदन प्रकरण अजूनही CGM न्यायालयात विचाराधीन आहे आणि वडिलांनी 17 दिवसांपासून आपल्या मुलाचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवून न्यायाच्या निर्णयाची वाट पाहत आहे.