मुंबई : मार्चमध्ये गॅलेक्सी A52 5G लॉन्च केल्यानंतर सॅमसंगने Galaxy A52s 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनमध्ये काही बदल केले आहेत. या फोनमध्ये शक्तिशाली प्रोसेसर असेल. Samsung Galaxy A52s 5G वॉटरप्रूफ असेल, म्हणजेच हा फोन पाण्यात अजिबात खराब होणार नाही. तसेच, त्याची बॅटरी देखील खूप मजबूत आहे. त्याचा कॅमेराही जबरदस्त आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आणि जबदस्त फीचर्स...
फोनच्या डिझाईनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तुम्हाला सेल्फी कॅमेऱ्यासाठी मध्यभागी छिद्र असलेला फ्लॅट इन्फिनिटी-ओ AMOLED डिस्प्ले मिळेल. मागे अजून चार कॅमेरे आहेत. खरेदीदारांना फोन चार रंगांमध्ये मिळू शकतील. ओसम ब्लॅक, ओसम मिंट, ओएसएम व्हायोलेट आणि ओएसएम व्हाइट.
गॅलेक्सी A52s 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह एक 6/5-इंच FHD सुपर AMOLED स्क्रीन आहे. डिस्प्लेच्या आतमध्ये 32 एमपी कॅमेरा आहे. हुड अंतर्गत स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आहे आणि ते 6GB किंवा 8GB रॅम आणि 128GB किंवा 256GB स्टोरेजसह जोडलेले आहे.
फोनच्या मागील बाजूस चार कॅमेरे आहेत. प्रायमरी 64 एमपी कॅमेरा आहे. 12 एमपी अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, 5 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 5 एमपी डेप्थ सेन्सर आहे. Galaxy A52S 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यात IP67 पाणी आणि धूळ यापासून संरक्षण मिळू शकणार आहे, याचा अर्थ फोन अर्धा तास पाण्यात राहू शकतो. फोनची बॅटरी 4500mAh आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॅमसंगने दावा केला आहे की, यूजर्स एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर दोन दिवस मोबाईल बॅटरीवर सुरु राहिल.
Galaxy A52s तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल - 6+128GB, 8+128GB आणि 8+256GB. हा फोन सध्या यूकेमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यूकेमध्ये सुरुवातीची किंमत 409 पाउंड (41,791 रुपये) आहे. हा फोन 24 ऑगस्टपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल आणि 3 सप्टेंबरपासून शिपिंग होईल.