मुलीला ड्रीम डेस्टिनेशनवर सोडायला गेलेल्या वडिलांना अश्रू अनावर; 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिलाय हा व्हिडीओ

मुलीला सोडायला गेलेल्या वडिलांना रडू आवरेना  

Updated: Nov 7, 2022, 01:57 PM IST
मुलीला ड्रीम डेस्टिनेशनवर सोडायला गेलेल्या वडिलांना अश्रू अनावर; 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिलाय हा व्हिडीओ title=

Viral Video : आपल्या मुलांना यशाची पायरी चढताना पाहून प्रत्येक पालकाला (parents) गर्व तर होतोच पण तितकेच ते भावूकही होतात. पालकांना आपल्या मुलांचा कायमच अभिमान वाटतो आणि त्याचवेळी त्यांचे डोळेही आनंदाने भरून येतात. अनेकदा असे क्षण आपल्या सर्वांना खूप भावूक करतात. मात्र मुले हे यश मिळवण्यासाठी काही काळ त्यांच्या पालकांपासून दूरही जातात. मग ते शिक्षणासाठी (Education) असो किंवा कामासाठी. अशावेळी जेव्हा त्यांची मुले कॉलेजसाठी (College) दुसऱ्या शहरात जातात तेव्हा पालकांसाठी हा भावनिक क्षण असतो. मुलांनी त्यांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल पालकांना अभिमान तर वाटतोच पण आता थोडे दिवस का होईना सोबत नसल्याचं दुखःही असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय ज्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं आहे.

इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक वडील आपल्या मुलीला सोडायला कॉलेजला जाताना भावनिक झाल्याचे पाहायला मिळला. दिल्ली विद्यापीठातील (delhi university) मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये मुलीच्या ड्रीम डेस्टिनेशनवर मुलीला सोडण्यासाठी आलेल्या एका पित्याच्या डोळ्यांत अश्रू दिसत होता. हा व्हिडिओ प्रेक्षा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चार दिवसांपूर्वी पोस्ट केला होता आणि त्याला आतापर्यंत 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अभिनेता रोहित सराफ, आयुष मेहरा तसेच नेटफ्लिक्स इंडियानेही (netflix) आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये प्रेक्षाचे पालक ई-रिक्षातून प्रवास करताना दाखवले आहेत जेव्हा ते तिला दिल्लीतील मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये सोडण्यासाठी आले होते. कॉलेज हे माझे 'ड्रीम डेस्टिनेशन' होते, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. प्रेक्षाचा पहिला दिवस होता म्हणून ते कॅम्पसमध्ये फिरत होते. तेव्हा अचानाक तिला दिसले की तिच्या वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते कारण ते आनंदाने भारावून गेले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Preksha (@pre.xsha)

'ते मला माझ्या स्वप्नातील ठिकाणी, मिरांडा हाऊस कॉलेज, दिल्ली विद्यापीठात सोडायला आले होते. हा माझा पहिला दिवस होता म्हणून आम्ही फक्त कॅम्पसचा फिरत होतो आणि अचानक माझ्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, असे प्रेक्षाने पोस्ट केलेल्या व्हिडीओसोबत म्हटले आहे.