नवी दिल्ली : वस्तू किंवा सोनं खरेदी करताना अनेकदा ग्राहकांची मोठी फसवणूक केली जाते. या फसवणूकीला आळा घालणं, बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सोनं खरं-खोटं किती आहे, हे समजणं आता सोपं होणार आहे. हे काम आता मोबाईलवर एका खास ऍपद्वारे केलं जाऊ शकतं.
ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत हे अधिकार देण्यात आले आहेत. आता बाजारात वस्तू किंवा अगदी सोनं खरेदी करताना ते खरं आहे की खोटं हे त्वरित तपासता येऊ शकतं. मोबाईल ऍपद्वारे ही तपासणी केली जाईल.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने, BIS (Bureau of Indian Standards) अर्थात भारतीय मानक ब्यूरोचं एक मोबाईल ऍप लॉन्च केलं आहे. BIS मोबाईल ऍपवर कोणतीही वस्तू किंवा सोन्याचीही पडताळणी अगदी सहजपणे करता येणार आहे. वस्तूवर देण्यात आलेल्या ISI मार्क लायसन्स नंबर मोबाईल ऍपमध्ये टाकून, लायसन्स नंबर खरा आहे की खोटा हे तपासता येऊ शकतं. त्यावरुन वस्तूचीही पडताळणी होईल.
जर लायसन्स नंबर योग्य असेल, तर ऍपवर प्रोडक्टच्या ब्रँडपासून, मेकिंग यांसारखी संपूर्ण माहिती समोर येईल. त्याचप्रमाणे, सोनं खरेदी करताना हॉलमार्क नंबर मोबाईल ऍपवर टाकून पडताळणी करता येऊ शकते.
जर लायसन्स नंबर किंवा हॉलमार्क नंबर योग्य नसेल, तर त्याच मोबाईल ऍपवर त्वरित तक्रार दाखल करता येईल. तक्रार दाखल केल्यानंतर, तक्रारदाराला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज आणि तक्रार नंबर येईल.
प्ले स्टोरवर BSI मोबाईल ऍप डाऊनलोड करताना, ऍपखाली GS1 लिहिलंल ऍप असावं. हे ऍप एंड्रॉईड आणि ISO दोन्हीवरही उपलब्ध आहे. हे ऍप प्रोडक्टच्या मागे असलेला बारकोड स्कॅन करतं. ऍप ओपन केल्यानंतर, ज्या प्रोडक्टबाबत माहिती हवी आहे, त्याचा कोड स्कॅन करा.
जर बारकोड स्कॅन होत नसेल, तर Barcodeजवळ लिहिलेला GTIN टाईप करा. त्यानंतर प्रोडक्टची संपूर्ण माहिती मॅन्युफॅक्चरर डेट, किंमत, FSSAI लायसन्स याबाबत माहिती समोर येईल.