Fact Check : काय सांगताय! तुमच्या एटीएम कार्डमध्ये सोनं?

तुमच्याकडे एटीएम कार्डमध्ये (Atm Card) सोनं (Gold) दडलंय. एटीएमवर दिसणाऱ्या सोनेरी चिपमध्ये हे सोनं असल्याचा दावा करण्यात आलाय.  

Updated: Sep 26, 2022, 11:39 PM IST
Fact Check : काय सांगताय! तुमच्या एटीएम कार्डमध्ये सोनं? title=

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे : बातमी आहे एका (Viral Video) व्हायरल व्हीडिओची. तुमच्याकडे एटीएम कार्डमध्ये (Atm Card) सोनं (Gold) दडलंय. एटीएमवर दिसणाऱ्या सोनेरी चिपमध्ये हे सोनं असल्याचा दावा करण्यात आलाय. पण, हा दावा कितपत खरा आहे? एटीएम कार्डमध्ये सोनं असतं का? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol gold in your atm card know what true what false)

दावा आहे की, डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये सोनं दडलंय. एक व्हिडिओ व्हायरल करून एटीएमवर सोनेरी दिसणाऱ्या चीपमध्ये सोनं असल्याचा दावा करण्यात आल्याने अनेकांना याची उत्सुकता लागलीय. पण, खरंच एटीएम कार्डमध्ये सोनं असतं का? सोनं असतं मग किती प्रमाण असतं? प्रत्येकाकडे एटीएम कार्ड असल्याने आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी बँकिँग एक्स्पर्टला भेटले. त्यांना हा व्हिडिओ दाखवला. खरंच एटीएम कार्डमध्ये सोनं असतं का? याची त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

पडताळणीत काय सत्य समोर?

इलेक्ट्रॉनिक्स सर्किटमध्ये सोन्याचा वापर होतो. इलेक्ट्रॉनिक्स सर्किटमध्ये सोन्याचं प्रमाण अल्प असतं. याला ई-कचरा म्हटलं जातं. ई कचऱ्यामध्ये मेटल बाजूला काढून सोनं काढलं जातं. त्यामुळे आमच्या पडताळणीत एटीएम कार्डमध्ये सोनं असतं हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला. पण, याचं प्रमाण अल्प असतं. याची बाजारात किंमतही नगण्य असते.