Fact Check : पॅन अपडेट न केल्यास बँक खातं बंद होणार?

हा मेसेज एसबीआय बँकेच्या नावाने व्हायरल झाल्याने आम्ही याबाबत बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.   

Updated: Nov 14, 2022, 10:35 PM IST
Fact Check : पॅन अपडेट न केल्यास बँक खातं बंद होणार? title=

Viral Messege : तुमचं बँकेत खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्हाला पॅन अपडेट करण्यासाठी मेसेज आला असेल तर सावध व्हा. कारण, तुमचं पॅन अपडेट केलं नाही तर अकाऊंट ब्लॉक होईल असा दावा करण्यात आलाय. पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check if pan card is not updated account will be blocked know what false what true) 

दावा आहे की पॅन अपडेट केलं नाही तर तुमचं बँक खातं बंद होईल. असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. बँकांकडून तसे मेसेज पाठवण्यात आलेयत. त्यासोबत लिंकही पाठवण्यात आलीय. प्रत्येकाचं बँकेत खातं आहे. त्यामुळे या मेसेजचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही या मेसेजची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा. 

PAN अपडेट केले नाही, तर अकाउंट ब्लॉक होईल. PAN लवकर अपडेट करून घ्या. मेसेजमध्ये लिंकही पाठवण्यात आलीय. हा मेसेज एसबीआय बँकेच्या नावाने व्हायरल झाल्याने आम्ही याबाबत बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. असा मेसेज ग्राहकांना पाठवलाय का? याची आम्ही माहिती घेतली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहा.

व्हायरल पोलखोल

बँक ग्राहकांना जागरुक करण्यासाठी मेसेज करते. पॅन अपडेटबाबत एसबीआय बँकेने मेसेज पाठवलेला नाही.  बँक आपले पर्सनल आणि बँकिंग डिटेल्स SMSवर मागवत नाही. अशा प्रकारचे ई-मेल आणि एसएमएसला कधीही उत्तर देऊ नका. 

देशात डिजिटलायझेशन वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ होतेय. अनेकवेळा आपल्याला माहितीच्या अभावाने चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यानं मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे या दाव्यात तथ्य नसून, आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.