ना लाईनची कटकट ना फास्टटॅगची झंझट; टोलचा झोल संपणार

वाहन चालकांना टोल नाक्यावर लांबच लांब रांगेत ताटकळत थांबाव लागत. मात्र, आता यातुन सुटका होणार आहे. 

Updated: Nov 14, 2022, 10:28 PM IST
ना लाईनची कटकट ना फास्टटॅगची झंझट; टोलचा झोल संपणार  title=

New Toll Policy, नवी दिल्ली : ना लाईनची कटकट ना फास्टटॅगची झंझट... लवकरच टोलचा झोल संपणार आहे. एक्स्प्रेस वे किंवा हायवेवर प्रवास करणा-यांसाठी मोठा दिलास देणारी बातमी आहे. लवकरच देशात टोल वसुली(toll collection) संदर्भात नवं धोरण राबवल जाणार आहे. यामुळे वाहन चालकांना टोल नाक्यावर टोल द्यावा लागणार नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Union Transport Minister Nitin Gadkari) या धोरणाबाबत माहिती दिली.

केंद्र सरकार टोल वसुलीसाठी नवं विधेयक आणणार 

वाहन चालकांना टोल नाक्यावर लांबच लांब रांगेत ताटकळत थांबाव लागत. मात्र, आता यातुन सुटका होणार आहे. कारण, केंद्र सरकार टोल वसुलीसाठी नवं विधेयक आणणार आहे. 

टोल थेट वाहन चालकांच्या बँकेच्या खात्यातून कापला  जाणार

टोल वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार, टोल थेट वाहन चालकांच्या बँकेच्या खात्यातून कापला  जाणार आहे. 

या नव्या धोरणामुळे फास्टटॅगची झंझटही संपणार आहे. वाहन चालक जेवढं अंतर कापतील तेवढाच टोल त्यांना भरावा लागणार आहे. आधी 10 किलोमीटर अंतर कापलं तरी 75 किलोमीटरपर्यंतचा टोल भरावा लागत होता, पण आता यामध्ये लवकरच बदल करण्यात येणार आहे. या नविन धोरणामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.