Fact Check : केंद्र सरकारकडून बेरोजगार तरुणांना दरमहा 6 रुपये मिळणार

Fact Check : मोदी सरकार (unemploymed Youth) बेरोजगार तरुणांना दरमहा 6 रुपये देणार असल्याचा दावा केला जात आहे.   

Updated: Aug 22, 2022, 05:17 PM IST
Fact Check : केंद्र सरकारकडून बेरोजगार तरुणांना दरमहा 6 रुपये मिळणार title=

PIB Fact check : केंद्र सरकारकडून (Central Government)  समाजातील विविध घटकांसाठी योजना राबवल्या जातात. यामध्ये महिला, गरीब आणि तरुणांनासह इतरांनाही आर्थिक सहाय्य मिळतं.सध्या  Whtsapp वर एक (Viral Message) मेसेज व्हायरल होतोय.  मोदी सरकार (unemploymed Youth) बेरोजगार तरुणांना दरमहा 6 रुपये देणार असल्याचा दावा केला जात आहे. पीआयबीने या मेसेजची दखल घेत याची तथ्य पडताळणी केलीय. पीआयबीने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज खरा आहे की खोटा हे स्पष्ट झालंय. (fact check central government give to 6 thousand per month unemployed youth know what truth what false)

पीआयबीने काय म्हटलंय? 

Whatsapp मेसेजमध्ये दावा केला आहे की प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेनुसार, सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 6 हजार भत्ता देत आहे, असं ट्विट पीआयबीने केलंय. 

काय खरं काय खोटं?

या व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घेण्यासाठी पीआयबीने फॅक्ट चेक केलं. पीआयबीच्या पडताळणीत हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं. केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना सुरु नसल्याचं पडताळणीतून समोर आलं.

पीआयबीच्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?

व्हायरल होणारा मेसेज खोटा आहे. केंद्र सरकार अशा कोणत्याही प्रकारची योजना राबवत नाहीये. कृपया करुन असे मेसेज फॉरवर्ड करु नका, असं आवाहन पीआयबीकडून करण्यात आलंय.