'या' मार्गाने फेसबूक करणार मतदारांना जागरूक!

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 7, 2017, 11:38 AM IST
'या' मार्गाने  फेसबूक करणार मतदारांना जागरूक! title=

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी राजकीय पक्ष झटत आहेत. मात्र यात सोशल मीडियाने देखील एक पाऊल उचलले आहे. घरातून बाहेर पडून मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करण्यात सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. 

९ नोव्हेंबर, ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबरला फेसबुक ‘न्यूज फीड’मध्ये मतदारांना संदेश पाठवेल. त्यामुळे हिमाचल आणि गुजरातच्या लोकांना निवडणुकीचे लक्षात राहील आणि ते मतदान करण्यास प्रोत्साहित होतील. फेसबुक इंडियाचे वरिष्ठ अधिकारी नितिन सलूजा यांनी सांगितले की, "राज्य निवडणुकीत लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी फेसबुकतर्फे हा संदेश पाठवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नक्कीच मदत होईल."

त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष सोशल मीडियाची मदत घेत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात देखील सोशल मीडिया महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.