Exit Poll Results Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे.
झिनीयाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 310 जागा मिळतील. तर 'इंडिया' 188 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 45 जागा मिळतील.
झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा जागांपैकी इंडिया आघाडीला 15 ते 20 जागा मिळू शकतात तर एनडीएला 26 ते 34 जागा मिळू शकतात.
आंध्र प्रदेशमध्ये एकूण 25 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 4 जागा तर एनडीएला 12 ते 16 जागा मिळू शकतील. येथे इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
बिहारमधील एकूण 40 जागांपैकी इंडिया आघाडीला 15 ते 25 जागा तर एनडीएलादेखील 15 ते 25 जागांचा अंदाज वर्तवला गेलाय.
गुजरातमधील एकूण 26 लोकसभा मतदार संघापैकी इंडिया आघाडीला 2 ते 4 जागा तर एनडीएला 20 ते 26 जागा मिळतील.
कर्नाटकमधील एकूण 28 जागांपैकी इंडिया आघाडीला 12 ते 20 जागा तर एनडीएला 10 ते 14 जागा मिळू शकतात.
मध्य प्रदेशमधील एकूण 29 जागांपैकी इंडिया आघाडीला 8 ते 12 जागा तर एनडीएला 16 ते 22 जागा मिळतील.
राजस्थानच्या एकूण 25 जागांपैकी इंडिया आघाडीला 6 ते 10 जागा तर एनडीएला 15 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूच्या एकूण 39 जागांपैकी 21 ते 27 जागा इंडिया आघाडीला मिळतील तर एनडीला 10 ते 12 जागा मिळतील. इतर पक्षांना 3 ते 5 जागा मिळतील.
उत्तर प्रदेशच्या एकूण 80 लोकसभा जागांपैकी इंडिया आघाडीला 22 ते 26 जागांवर विजय मिळू शकतो. तर एनडीएला 52 ते 58 जागांवर विजय मिळू शकतो. तर 1 जागा इतर पक्षांना मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमधील एकूण 42 जागांपैकी 1 जागा इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता तर 20 ते 24 जागा एनडीएला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे इतर पक्षांना 16 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे.
अंदमान निकोबार येथे 1 जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये 2 जागा एनडीएला मिळू शकतात.
आसाममध्ये 1 ते 3 जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात तर एनडीएला 8 ते 12 जागा मिळू शकतात. इतर पक्षांना 1 ते 3 जागा मिळू शकतात.
छत्तीसगढ, दादरा नगर हवेली, दमण आणि दिव येथे एनडीएला प्रत्येकी 1 जागा मिळू शकते.
दिल्लीमध्ये 7 जागांपैकी 3 ते 5 जागा इंडिया आघाडीला तर एनडीएला 2 ते 4 जागा मिळू शकतात.
गोव्यातील दोन्ही जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आहे.
हरयाणाच्या 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 5 ते 7 जागा तर एनडीएला 3 ते 5 जागा मिळू शकतात.
हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 4 जागांपैकी 1 ते 3 जागा इंडिया आघाडीला तर 2 ते 3 जागा एनडीएला मिळू शकतात.
जम्मू काश्मीरच्या एकूण 6 जागांपैकी 2 ते 3 जागा इंडिया आघाडीला तर एनडीएला 1 जागा मिळू शकेल. येथे इतर पक्षांना 1 जागा मिळू शकते.
झारखंडमध्ये एकूण 14 जागांपैकी 2 ते 4 जागा इंडिया आघाडीला तर एनडीएला 10 ते 12 जागा मिळू शकतात.
केरळामध्ये एकूण 20 जागांपैकी इंडिया आघाडीला 10 ते 12 जागा तर एनडीएला 5 ते 7 जागा मिळू शकतात. इतर पक्षांना 2 ते 5 जागा मिळू शकतात.
लडाख, लक्षद्वीपची प्रत्येकी एक जागा इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.
मणिपूर, मेघालयमधील प्रत्येकी 2 जागा एनडीएला मिळतील. तर मिझोरम, नागालॅंडमधील प्रत्येकी 1 जागा एनडीएला मिळेल.
ओडीशाच्या 21 जागांपैकी 4 ते 6 जागा इंडिया आघाडीला तर एनडीएला 10 ते 14 जागा मिळतील. 3 ते 5 जागा इतर पक्षांना मिळण्याची शक्यता आहे.
पॉंडेचरीची 1 जागा इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.
पंजाबच्या 13 जागांपैकी 3 ते 5 जागा इंडिया आघाडीला तर एनडीएला 5 ते 7 जागा मिळतील. इतर पक्षांना येथे 2 ते 4 जागा मिळतील.
सिक्कीमची 1 जागा एनडीएला मिळणार आहे.
तामिळनाडूच्या 39 जागांपैकी 21 ते 27 जागा इंडिया आघाडीला एनडीएला 10 ते 12 जागा मिळतील.
तेलंगणामध्ये 10 ते 14 जागा इंडिया आघाडीला तर 4 ते 6 जागा एनडीएला मिळतील.
त्रिपुराच्या 2 जागांपैकी 1 जागा इंडिया आघाडीला तर 1 जागा एनडीएला मिळतील.
उत्तराखंडच्या 5 जागांमध्ये 1 ते 2 जागा इंडिया आघाडीला तर 3 ते 5 जागा एनडीएला मिळू शकतील.
एनडीएच्या जागा घटणार मात्र मोदी सरकारच येणार
उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, या राज्यात एनडीएच्या जागा कमी होण्याची शक्यता
तर दक्षिणकेडील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश मध्ये एनडीएच्या जागा वाढण्याची शक्यता
पश्चिम बंगालमध्येही काही प्रमामात एनडीच्या जागा वाढण्याचा अंदाज, टीमसीला मागे टाकात भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता
(DISCLAIMER:2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, ZEE २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)