मनमोहन सिंगांची मोदींविरोधात तक्रार, राष्ट्रपतींकडे तक्रारीचं पत्र

Updated: May 14, 2018, 06:38 PM IST

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार करणारं पत्र राष्ट्रपतींना पाठवलंय. या पत्रात त्यांनी मोदींनी समज देण्याची मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलीय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी काँग्रेस नेत्यांविरोधात धमकीची आणि चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप मनमोहन सिंगांसह प्रमुख काँग्रेस नेत्यांनी या पत्रात केलाय.

पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीला अशी भाषा शोभत नसून त्याचा तीव्र शब्दांत काँग्रेस नेत्यांनी निषेध व्यक्त केलाय.