'भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदूच' सरसंघचालक मोहन भागवतांची रोखठोक भूमिका

'40 हजार वर्षांपासून प्रत्येक भारतीयाचा DNA एकच, जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना'

Updated: Nov 16, 2022, 03:21 PM IST
'भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदूच' सरसंघचालक मोहन भागवतांची रोखठोक भूमिका title=

RSS Mohan Bhagwat : सरसंघचालक (RSS) मोहन भागवतांनी (Mohan Bhagwat) पुन्हा एकदा डीएनएचा (DNA) उल्लेख केलाय. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा डीएनए 40 हजार वर्षांपासून एकच आहे, भलेही मग तो हिंदू (Hindu) असेल वा मुसलमान (Muslim). सर्वांचा डीएनए एकच आहे असं मोहन भागवतांनी म्हटलंय. सरसंघचालकांनी जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरावरही (Conversion) चिंता व्यक्त केलीय. जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरावर सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) नोंदवलेल्या निरीक्षणाचाही भागवतांनी दाखला दिला.

भारताच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्म आणि आस्थेनुसार पूजा करण्याचा अधिकार दिलाय. पण कुणालाही आपला धर्म दुसऱ्यावर लादण्याचा, आमिष दाखवून किंवा दबाव टाकून धर्मपरिवर्तनाचा अधिकार नाही. याचाच दाखला भागवतांनी दिला, त्याचवेळी प्रत्येक भारतीयाचा डीएनए एक असल्याचं मोठ विधान भागवतांनी केलं आहे. 

काबूलच्या पश्चिमेपासून ते छिन्दविन नदीच्या पूर्वेपर्यंत तिबेटच्या उत्तरेपासून म्हणजेच चीनपासून ते श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रदेशातल्या सर्व लोकांचा डीएनए 40 हजार वर्षांपासून एकच आहे. तो म्हणजे हिंदू, 40 हजार वर्षांपासून आपल्या साऱ्याचे पूर्वज एकच आहेत.  संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे. विविधतेत एकता हीच भारताची ओळख आहे. भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, असं आम्ही आरएसएसची स्थापना झाल्यापासून ठामपणे सांगत आहोत असं भागवत यांनी म्हटलं आहे. 

भारताला आपली मातृभूमी मानतात आणि ही विविधता असून एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहू इच्छितात ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदूच आहेत असंही भागवत यांनी म्हटलं आहे.