EPFO | फॉर्म 10 सी म्हणजे काय? PF ची रक्कम काढताना का गरजेचे असते?

 कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)आपल्या सभासदांना एम्प्लॉयर पेंशन स्किम (EPS)चा लाभ देते.

Updated: Aug 7, 2021, 07:57 AM IST
EPFO | फॉर्म 10 सी म्हणजे काय? PF ची रक्कम काढताना का गरजेचे असते? title=

मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)आपल्या सभासदांना एम्प्लॉयर पेंशन स्किम (EPS)चा लाभ देते. EPF मध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोन्हींकडून पैसे गुंतवले जातात.

आता तुम्ही नोकरी सोडत असाल, तर पीएफमधून पैसे काढण्यासाठी फॉर्म 19. फॉर्म 10 सी, फॉर्म 10डी सारखे फॉर्म भरणे गरजेचे आहे. यासाठी फॉर्म 10 सीचा वापर पेंशनचा पैसा काढण्यासाठी केला जातो.

केव्हा काढू शकता पैसे?
जर तुम्ही कमीत कमी 180 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्ष नोकरी केली. तर तुम्ही पेंशन फंड काढू शकता. जर तुम्ही नोकरी सोडून दिली असेल. तर अशा स्थितीत तुम्ही पेंशन ऑनलाईनसुद्धा काढू शकता. ज्यासाठी आपल्याला EPF Form 10 C भरण्याची गरज पडेल.

EPS प्रमाणपत्रासाठी फॉर्म 10 सी
EPFO सभासदाच्या EPF/EPS सर्टिफिकेटवर त्याच्या नोकरीच्या कालावधी आणि कौटुंबिक माहिती असते. पेंशन स्किम  सर्टिफिकेट EPFOच्या वतीने जारी करण्यात येतो. PF अकाउंटमध्ये EPF च्या सोबतच EPS चे पैसे देखील जमा होतात. कोणत्याही कारणामुळे एम्प्लॉईचा मृत्यू झाल्यास पीएफचे पैसे नॉमिनीला मिळतात. त्यासाठी कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला 10 सी फॉर्म भरावा लागतो.

ऑनलाईन करा अप्लाय

  • फॉर्म 10 सी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे भरू शकता. ऑनलाईन भरण्यासाठी EPFO पोर्टलवर एम्प्लॉई पोर्टलवर जा.
  • तेथे UAN नंबर आणि पासवर्ड भरा.
  • मेन्युमधील ऑनलाईन सेवा निवडा
  • फॉर्म 10 सी, 19, 31 वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला जॉब, केवायसी आणि सदस्यांची माहिती.
  • बॅंक अकाउंट वेरिफिकेशन होईल.
  • सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंगची सहमती द्यावी लागेल.
  • त्यानंतर पेंशन फंड काढण्यासाठी फॉर्म 10 सी सिलेक्ट करा.
  • ओटीपी सिलेक्ट करा. आधार ओटीपीच्या वेरिफिकेशन नंतर क्लेम फॉर्म सबमिट होईल.