मुंबई : नोकरदार वर्गासाठी PF च्या बाबतीत महत्वाची अपडेट आहे. 1 सप्टेंबरपासून EPFO आपल्या नियमांमध्ये बदल करणार आहे. प्रोविडंट फंडशी संबधीत नियम लागू होणार आहे. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही. तर तुमची कंपनी दरमहिन्याला तुमच्या PF खात्यात जमा करणारी रक्कम जमा करू शकणार नाही. दर महिन्याला जमा होणाऱ्या 12 टक्के अंशदान (कंपनीचे कंट्रीब्यूशन)करू शकणार नाही. असं झालं तर तुमच्यासाठी हे मोठे नुकसान आहे.
UAN - Aadhaar Link करणे गरजेचे
1 सप्टेंबर पासून EPFO युनिवर्सल अकॉउंट नंबर (UAN)ला आधारशी लिंक करणार आहे. याआधी सब्सस्क्राइबर्सला अलर्ट पाठवण्यात आले आहेत. अजूनही अनेक अकॉउंट असे आहेत ज्यांनी UAN ला आधार लिंक केलेले नाही. जर असे नाही झाले तर प्रोविडंट फंड अकॉउंटमध्ये पैसे क्रेडिट करू शकणार नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)ने ईपीएफ खातेधारकांना 1 सप्टेंबर 2021 च्या आधी UAN-Aadhaarलिंक करणे गरजेचे आहे.
EPFOने जूनमध्ये इलेक्ट्रॉनिक चलन आणि रिटर्न (ECR)भरण्यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यांनी एम्पॉयर्सला फक्त त्या एम्पॉइजसाठी ECR भरण्याची परवानगी दिली आहे. ज्यांचे आधार UANसह लिंक आहे. EPFO ने एम्लॉयर्सला हे देखील सांगितले आहे की, सर्व एम्पॉइजचे UAN -Aadhaarलिंक्ड असायला हवे. PF अकॉउंटमध्ये पैसे जमा न झाल्यास व्याजाचेही नुकसान होऊ शकते.
UAN-Aadhaar लिंक कसे करावे
https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
आपला UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
Manage सेक्शन KYC या पर्यायवर क्लिक करा
EPF अकॉउंटसोबतच आधार लिंक करण्यासाठी अनेक डॉक्युमेंट दिसतील
Aadhaar पर्यायाची निवड करा. आपला आधार नंबर आणि नाव टाइप करा.
UIDAI चा डेटा वेरिफाई होईल.
KYC डॉक्युमेंट वेरिफाई झाल्यानंतर आधारला EPF अकाउंटला लिंक करण्यात येईल.
KYC पर्यायामध्ये Aadhaarच्या समोर Varify लिहलेले दिसेन