तुमच्या आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचे कर्ज! 90 टक्के लोकांना नाही माहिती ही गोष्ट

Emergency loan on Aadhaar:  भारत सरकारने जारी केलेले आधार हे आता केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा राहिलेले नाही. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 17, 2025, 03:40 PM IST
तुमच्या आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचे कर्ज! 90 टक्के लोकांना नाही माहिती ही गोष्ट title=
आधारकार्डवर लोन

Emergency loan on Aadhaar: आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. मुलांचं शिक्षण असो, आरोग्याच्या समस्या अशावेळी तातडीने पैशांची गरज लागते. जर तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल आणि पैशांच्या कमतरतेशी झुंजत असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्या आधार कार्डद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज तुम्ही सहजपणे मिळवू शकता. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

भारत सरकारने जारी केलेले आधार हे आता केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा राहिलेले नाही. त्याच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकता. आपत्कालीन परिस्थितीत पैशांची आवश्यकता असलेल्यांना याचा फायदा होऊ शकतो. 

आधार कार्डवर कर्ज कसे मिळवायचे?

आधारवर कर्ज मिळवणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही लांबलचक प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वात आधी योग्य प्लॅटफॉर्म निवडा. आधार कार्डवर कर्ज देणारी बँक, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी किंवा डिजिटल लोन अॅप निवडा. त्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट किंवा अॅपला भेट देऊन ऑनलाइन अर्ज कराव. अर्ज करताना तुमची वैयक्तिक माहिती आणि कर्जाची रक्कम भरा. अर्ज प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. यामुळे तुमची ओळख आणि पत्ता यांचा पुरावा सहज पडताळता येईल. काही प्रकरणांमध्ये, बँक किंवा कर्ज देणारा तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी पॅन कार्ड, पगार स्लिप किंवा बँक स्टेटमेंट यांसारखी इतर कागदपत्रे देखील मागू शकतो.तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, कर्ज मंजूर केले जाईल आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

आधारवर कर्ज घेण्याची प्रक्रिया करणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असावा. त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा.

जलद प्रक्रिया 

आधार कार्डवर कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. कर्ज मंजुरी आणि रक्कम हस्तांतरण खूप कमी वेळेत होते. आधार कार्ड आणि काही मूलभूत कागदपत्रांसह कर्ज उपलब्ध आहे. कर्जाची परतफेड EMI द्वारे करण्याची सुविधा आहे.इतर पर्यायांच्या तुलनेत व्याजदर कमी असू शकतो.

या गोष्टी ठेवा लक्षात

कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा. फक्त विश्वसनीय बँकेकडून किंवा एनबीएफसीकडून कर्ज घ्या. तुमच्या परतफेडीची क्षमता किती आहे? याचे मूल्यांकन करा आणि तुम्ही वेळेवर ईएमआय भरू शकता याची खात्री करा.