मुंबई: प्राणी अनेकदा मजेशीर गोष्टी करत असतात त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच हत्तीचा हॅण्डपंपने पाणी काढून पित असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओ समोर आल्यानंतर हत्तीची स्तुती केली जात होती. अत्यंत बुद्धीमान प्राणी म्हणून हत्तीला ओळखलं जातं. पण भुक माणसाचच नाही तर प्राण्यांचही डोकं बधीर करते हे पाहायला मिळालं.
हत्ती मोठ्या झाडांना उद्ध्वस्त करतो शेताच नुकसान करतो असं बऱ्यादचा ऐकलं असेल. हत्तीचा उच्छाद घालवण्यासाठी बऱ्यादचा त्याची हत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हत्तीच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती रस्त्यावरून जात आहे.
Digest this: #Elephant from adjoining Amchang forest gobbles up a helmet in #Guwahati's Satgaon area. Wonder how it tasted! pic.twitter.com/VLQOzgzoLJ
— Rahul Karmakar (@rahconteur) June 10, 2021
Imagine the reaction of a #Traffic cop when bike owner tells him the reason for not wearing a helmet: "Eaten by an #elephant, sirji!"
— Rahul Karmakar (@rahconteur) June 10, 2021
Funny but sad too, he has no place to go and probably is hungry
— Gaurav (@boonysixx) June 10, 2021
रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकीवर एक हेल्मेट आहे. भुकलेल्या हत्तीला हे हेल्मेट दिसलं आणि त्याने हे हेल्मेट फळ समजून खाऊन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्तीने हे हेल्मेट आपल्य़ा सोंडेनं उचलून थेट तोंडात घालतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अनेकांनी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. हा हत्ती किती भुकेलेला असेल याचा अंदाज हा व्हिडीओ पाहून तुम्ही लावू शकता. आतापर्यंत या व्हिडीओला 3 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.