Electric car | टेस्लाच्या कार भारतात कधी येणार? एलन मस्क यांनी केला मोठा खुलासा

 टेस्ला (Tesla) च्या इलेक्ट्रिक करा भारतात कधी दाखल होतील याबाबत औपचारीक घोषणा झालेली नाही. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे म्हणणे आहे की, त्यांची कंपनी भारतात आपल्या कार लॉंच करू इच्छिते. परंतु ...

Updated: Jul 24, 2021, 02:55 PM IST
Electric car | टेस्लाच्या कार भारतात कधी येणार? एलन मस्क यांनी केला मोठा खुलासा title=

नवी दिल्ली :  टेस्ला (Tesla) च्या इलेक्ट्रिक करा भारतात कधी दाखल होतील याबाबत औपचारीक घोषणा झालेली नाही. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे म्हणणे आहे की, त्यांची कंपनी भारतात आपल्या कार लॉंच करू इच्छिते. परंतु भारतात इलेक्ट्रिक कारची इंम्पोर्ट ड्युटी जगात सर्वाधिक आहे. मस्क यांनी एका ट्विटर युजरने मस्क यांना टेस्लाच्या कार लवकरात लवकर भारतात लॉंच कराव्यात असे आवाहन केले होते.

मस्क यांनी म्हटले, आम्हीदेखील भारतात कार लॉंच करण्यास उत्सुक आहोत. परंतु भारतात आय़ात शुल्क अधिक आहे. तसेच क्लिन एनर्जी वाहनांना डिझेल आणि पेट्रोलसारखे समजले जाते. टेस्लाने याचवर्षी भारत सरकारला एसेम्बल कारांवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचे आवाहन केले आहे.

परंतु भारत सरकार टेस्लाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. सरकारने स्थानिक पातळीवर मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी अनेक उद्योगांची इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे.