देशावर दुष्काळाचं संकट, हे 2 महिने ठरले 121 वर्षातले सर्वाधिक उष्ण

हवामान बदलामध्ये मोठ्या संकटाची ही चाहूल आहे का? 

Updated: Mar 3, 2021, 09:39 PM IST
देशावर दुष्काळाचं संकट, हे 2 महिने ठरले 121 वर्षातले सर्वाधिक उष्ण title=

मुंबई : ऊन जरा जास्तच आहे असं दरवर्षी वाटतं. पण यंदाचे जानेवारी-फेब्रुवारी गेल्या १२१ वर्षांतले सगळ्यात उष्ण महिने ठरले आहेत. हा हवामानाचा बदल म्हणजे भविष्यातल्या संकटांचं ट्रेलर आहे. पुढच्या काही काळात अचानकपणे दुष्काळ वाढणार असल्याचा इशारा आयआयटी गांधीनगरनं दिला आहे.

हवामान बदलामध्ये मोठ्या संकटाची ही चाहूल आहे का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. हवामान बदलामुळे दुष्काळाचं संकट ही उभं आहे. आयआयटी गांधीनगरने हा इशारा दिला आहे. जमिनीतला ओलावा वेगानं संपला की अचानक दुष्काळ पडतो. हा अचानक पडलेला दुष्काळ दोन ते तीन आठवड्यांत संपूर्ण पीकं नासवतो. सध्याचं अतिउष्ण हवामान या दुष्काळाला कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेमध्ये पाच पटीनं वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात मोठ्या संकटांचा इशारा हवामानतज्ज्ञांनी आधीपासूनच दिला आहे. आता सर्वाधिक उष्ण ठरलेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांनी पुढे काय वाढून ठेवलंय, त्याचा इशारा दिलाय. आता दुष्काळाच्या इशाऱ्यानंतर तरी पीक नियोजन आणि सिंचन उपाययोजना वेळीच करणं अत्यंत गरजेचं आहे.

बातमीचा व्हिडिओ