Driving License बाबत मंत्रालयाकडू इशारा, या कारणामुळे होऊ शकते तुमचे नुकसान

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी माहिती शेअर केली आहे. 

Updated: Feb 2, 2022, 03:35 PM IST
Driving License बाबत मंत्रालयाकडू इशारा, या कारणामुळे होऊ शकते तुमचे नुकसान title=

मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी माहिती शेअर केली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्रा, मध्य प्रदेशसह देशातील कोणत्याही राज्यात गाडी चालवणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे. जर तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्सबाबत ही चूक केलीत तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. 

ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखाद्या ड्रायव्हरला ड्रायव्हिंग लायसन्स बाळगल्याबद्दल किंवा मिळवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले असेल आणि असे असतानाही त्याने सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवली तर त्याला 10 हजार रुपयांपर्यंत दंड आणि 3 महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

स्कूटीसाठी 23 हजार चलन कापले जातील

जर तुम्ही रहदारीचे नियम पाळले नाहीत आणि नवीन वाहतूक नियमांनुसार तुमच्या स्कूटीचे 23 हजार रुपयांचे चलन कापले जाऊ शकते. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय स्कूटी चालवल्याबद्दल - 5 हजार रुपये दंड, नोंदणी प्रमाणपत्राशिवाय (RC) वाहन चालवल्याबद्दल - 5 हजार रुपये चलन, विमाशिवाय - 2 हजार रुपये चलन, वायू प्रदूषण मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल - 10 हजार रुपये दंड आणि हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल तुम्हाल 1 हजार रुपयांचे दंड भरावे लागू शकते.

हे प्रकरण सप्टेंबर 2019 चे आहे जेव्हा नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले होते. त्यावेळी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करताना दिनेश मदान यांचे 23 हजार रुपयांचे चलन कापण्यात आले.