व्हिडिओ : कुत्रीचा पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्यावर हल्ला

मुंबई : आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी आई कायम सज्ज असते याला प्राणीही अपवाद नाही. मोठा प्राणी कायमच लहान प्राण्यांना आपला भक्षक बनवत असतो. पण असं असलं तरीही आई ही कायम आपल्या पिल्लांसाठी ढाल बनून सज्ज असते. असंच काहीस सिरमौर जिल्हातल्या राजगढमध्ये घडलं आहे. 

तेथील एक व्हिडिओ समोर आला आहे. सिरमौरच्या वनविभागातल्या कार्यालयात रात्री उशीरा एक बिबट्या घुसला. कार्यालयात असलेल्या कुत्र्याच्या छोट्या पिल्लांला मारण्याचा त्याचा विचार होता. मात्र तितक्यात त्या पिल्लाच्या आईने बचावासाठी बिबट्यावर झेप घेतली आणि बिबट्याने घाबरुन तिथून पळ काढल. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.