झाशी : बातमीचे शिर्षक वाचून एक तीव्र वेदना आणि संतापाची भावना तुमच्या मनात निर्माण झाली असेल तर, तुमचे आभार. कारण, तुमच्यातील मानवता आणि सुहृदयता अद्याप जीवंत आहे. घटना आहे उत्तर प्रदेशातील झाशी येथील निष्काळजीपणा आणि क्रूरतेचा कळस गाठलेल्या डॉक्टरच्या कृत्याची.
उत्तर प्रदेशातील झाशी येथील एका हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर आणि नर्सेसनी मानवतेची इतकी खालची पातळी गाठली की, उपचारासाठी आलेल्या रूग्णाच्या कापलेल्या पायाची उशी बनवली. ही उशी त्याच रूग्णालाच्या मानेखाली दिली. ज्याचा पाय कापला होता. हे निर्दयी डॉक्टर आणि नर्सेस यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे आपल्याच कापलेल्या पायाची उशी मानेखाली घ्यावी लागण्याची दूदैवी वेळ या रूग्णावर आली. प्रकरणाचा भांडाफोड होताच एका डॉक्टरसह चार जणांना तत्काळ निलंबीत करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाच्या तपासासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (१० मार्च) दीपक मेमोरियल स्कूलची एक बस विद्यालयाकडे निघालीहोती. दरम्यान, रस्त्यवरून जाताना एका ट्रॅक्टर ट्रॉलीला बसणारी संभाव्य धडक टाळण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात घडला आणि गाडी पलटी झालवी. या अपघातात १२हून अधिक मुले जखमी झाली. तर, क्लीनर घनश्याम याचा एक पाय तुटून बाजूला पडला. त्याला स्थानिक डॉक्टर्सनी प्राथमिक उपचार कर महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, घनश्यामची आई आणि भाऊ त्याचा तुटलेला पायही घेऊन रूग्णालयात आले होते.
#UttarPradesh: Attendants of a patient allege that staff at Maharani Laxmi Bai Medical College, Jhansi used his severed leg as a pillow for him after he was admitted there upon meeting with an accident, College Principal says 'We've set up committee to probe & will take action'. pic.twitter.com/lJFJ3SCjWf
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2018
He was given immediate medical aid. Doctor looked for something to raise his head. Patient's attendant used the leg for the same. We've set up committee. Strict action will be taken if our staff is found to be at fault: Sadhna Kaushik, Principal,Maharani Laxmi Bai Medical College pic.twitter.com/mLk6udOU1w
— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2018
दरम्यान, रूग्णालयाने त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र, त्याचा तुटका पाय त्याच्या मानेखाली दिला. धक्कादायक असे की, हा प्रकार पाहून घनश्यामचे कुटुंबिय उशीही घेऊन आले. पण, या उशीचा वापर डक्टरांनी घनश्यामच्या मानेखाली ठेवण्यासाठी करण्याऐवजी त्याच्या कापलेल्या पायाला आधार देण्यासाठी केला.