मित्रांसोबत विवस्त्र Photo शेअर करणाऱ्या डॉक्टरचा होणाऱ्या पत्नीने असा काढला काटा

होणाऱ्या पतीने फेक आयडी बनवून हे फोटो शेअर केले होते

Updated: Sep 20, 2022, 03:44 PM IST
मित्रांसोबत विवस्त्र Photo शेअर करणाऱ्या डॉक्टरचा होणाऱ्या पत्नीने असा काढला काटा title=

बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासूनर चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहातील (Chandigarh University) मुलींचे व्हिडिओ लीक झाल्याचे प्रकरण चांगलचं तापलं आहे. एका विद्यार्थिनीने 60 मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून लीक (video leak) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली होती. यानंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरुय. 

अशातच कर्नाटकातील बंगळुरुमधील (Bengaluru) एका डॉक्टरला आपल्या होणाऱ्या पत्नीचे न्यूड फोटो (private photos) मित्रांसोबत शेअर करणे आणि ते सोशल मीडियावर ( social media) अपलोड करणं भारी पडलं आहे. 27 वर्षीय डॉक्टरच्या होणाऱ्या पत्नीने हा प्रकार समजताच आपल्या तीन मित्रांसह डॉक्टरची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विकास राजन (Dr N Vikas) असे मृत डॉक्टरचे नाव असून तो चेन्नईचा ( Chennai) रहिवासी आहे.  (doctor shared Fiancee Private Photo to friends wife end his life)

पोलिसांनी महिलेच्या मित्रांचीही ओळख पटवली असून त्यांची नावे सुशील, गौतम आणि सूर्या अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबरच्या मध्यरात्री महिलेने तिच्या मित्रांसह डॉक्टरची हत्या केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर सूर्या अद्याप फरार आहे. हे सर्वजण बीटीएम लेआउटमधील रहिवासी असून वास्तुविशारद (Architecture) आहेत.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, विकासने युक्रेनमधून (Ukraine) एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेतले होते. त्याने 2 वर्षे चेन्नईत सराव केला. त्यानंतर तो बंगळुरुला गेला, जिथे त्याने फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन (FMGE) साठी प्रशिक्षण सुरू केले. ही हत्या सुशीलच्या घरी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींच्या हल्ल्यात विकास गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे 14 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. 

प्रकरण कसं बाहेर आलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभाने नुकतेच सोशल मीडियावर स्वतःचे आणि तिच्या आईचे फोटो शोधून काढले जे विकासनेच बनावट आयडी वापरून अपलोड केले होते. 10 सप्टेंबर रोजी या जोडप्यामध्ये या मुद्द्यावरून भांडण झाले. त्यानंतर प्रतिभाने तिच्या मित्रांना घटनेची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.

त्याच दिवशी, त्याच्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. आरोपींनी विकासला फ्लोअर मॉप स्टिक आणि बाटल्यांनी मारहाण केली. विकास बेशुद्ध पडल्याने त्याला जयश्री रुग्णालयात हलवण्यात आले आणि डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे सुचवले जेथे त्याचा मृत्यू झाला, असे बेगूर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

क्षुल्लक कारणावरून तिच्या मित्रांशी झालेल्या भांडणात विकास जखमी झाल्याची खोटी माहिती प्रतिभाने हॉस्पिटलला दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर प्रतिभाने विकासचा मोठा भाऊ विजय याला फोन केला आणि तिने हॉस्पिटलमध्ये सांगितलेली गोष्ट त्याला सांगितली.

प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, विकासचा मोठा भाऊ विजय याच्या तक्रारीनंतर खुनाच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. विकास या महिलेसोबत 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. घरच्यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी साखरपुडाही केला होता. पण, होणाऱ्या पत्नीचे नग्न फोटो शेअर केल्याने परिस्थिती आणखी बिघडली.