प्रियकरासोबत बाईकवर 'खुल्लमखुल्ला प्यार' पतीने Video बनवून शिकवला धडा

सोशल मीडियावर Video मोठ्याप्रमाणावर व्हायरल, लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया

Updated: Sep 20, 2022, 03:32 PM IST
प्रियकरासोबत बाईकवर 'खुल्लमखुल्ला प्यार' पतीने Video बनवून शिकवला धडा title=

Trending News : सोशल मीडिआवर (Social Media) दररोज कोणते ना कोणते Video व्हायरल होत असतात. सध्याच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पत्नीचा प्रियकराबरोबर खुल्लमखुल्ला प्यार करताना पतीनेच व्हिडिओ बनवला आणि भर रस्त्यात पत्नीला चांगलाच धडा शिकवला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या Video त एक महिला आपल्या प्रियकराबरोबर बाईकवरुन फिरत होती. त्या महिलेच्या पतीला आपल्या पत्नीचं बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय होता. पत्नी बाहेर पडताच पतीने आपल्या लहान मुलाला घेऊन तिचा पाठलाग सुरु केला. काही वेळाने पत्नी आपल्या प्रियकराला भेटली आणि त्याचाबरोबर बाईकवरुन निघाली

पतीने बाईकवरुन तिचा पाठलाग करत तिला रंगेहाथ पकडलं. पती तिला थांबवण्यासाठी हात दाखवत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. पण यानंतरही ती आणि प्रियकर न थांबता बाईक पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. यानंतर संतापलेल्या पतीने तिला शिवीगाळही केली. पत्नी प्रियकराबरोबर फिरत असल्याचा सर्व प्रकार पतीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

प्रियसीच्या पतीला बघातच घाबरलेल्या प्रियकराने तिला तिथेच सोडत बाईक घेऊन धूम ठोकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्या महिलेला चांगलाच धडा शिकवल्याचं म्हटलं आहे. giedde नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती टाकण्यात आलेली नाही.