मेरठ : यूपीच्या मेरठ मेडिकल कॉलेजच्या एका कार्यक्रमात सोमवारी डॉक्टरांनी जोरदार दारू पार्टी केली आणि रशियन डान्सरसोबत ठुमके लगावले. या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या कार्यक्रमात रशियन डान्सरकडून अश्लिल डान्स करण्यात आला. तर डॉक्टरांनी अॅम्बुलन्समधून दारूच्या पेट्या मागवल्या. या घटनेवर जोरदार टीका होत असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे.
एलएलआरएम मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी ओल्ड स्टुडेंट असोसिएशनकडून प्रत्येक वर्षी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यावर्षी १९९२ च्या बॅचच्या ओल्ड स्टुंडंटकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॉलेजच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यात शहरातील अनेक डॉक्टरांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात दारू पोटा घातली आणि अश्लिल डान्सचा आनंद घेतला. या कार्यक्रमात रशियन डान्सरला बोलवण्यात आलं होतं. रूग्णांना उपचारासाठी अॅम्बुलन्स मिळत नाही, पण डॉक्टरांनी त्यात दारूच्या पेट्या भरून आणण्याचा करनामा केलाय.
सीएमओ डॉ. राजकुमार म्हणाले की, ‘या प्रकरणाची चौकशी केली जाईल. जर असे झाले असेल तर ते चुकीचं आहे’ वेगवेगळ्या राजकीय लोकांकडूनही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.