आली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील

Diwali 2022 : दिवाळी काही ना काही खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. हा सणच तसा आहे. वर्षभर मेहनत करत देवाच्या कृपेनं आपण जे काही कमवतो त्यातूनच काही भाग खर्ची घालत दिवाळीसाठी बरेचजण अमर्याद Shopping करतात. अंबानी कुटुंबही यात मागे नाही... 

Updated: Oct 17, 2022, 01:23 PM IST
आली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील  title=
Diwali 2022 Mukesh Ambani buys 2 new Rolls Royces for festival of lights

Mukesh Smbani Diwali 2022 : दिवाळी काही ना काही खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. हा सणच तसा आहे. वर्षभर मेहनत करत देवाच्या कृपेनं आपण जे काही कमवतो त्यातूनच काही भाग खर्ची घालत दिवाळीसाठी बरेचजण अमर्याद Shopping करतात. अंबानी कुटुंबही यात मागे नाही. दिवाळीची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच अंबानी कुटुंबानं डोळे दीपवणारी Shopping केली आहे. इथं डोळे दीपवणारं असं का म्हटलं जातंय हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

आशिया खंडातील आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ज्यांचं नाव येतं, त्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दिवाळीपूर्वीच एक नव्हे, दोन नव्याकोऱ्या Rolls Royce कार खरेदी केल्या आहेत. यापैकी एक कार मुंबईत, तर दुसरी गुजरातमधील अहमदाबाद येथे असेल. 

अधिक वाचा : मुकेश अंबानींच्या घरात गोड बातमी; नातू पृथ्वी झाला 'मोटा भाई'

Rolls-Royce Phantom या दोन कार त्यांनी खरेदी केल्या आहेत. सोशल मीडियावर यापैकी अहमदाबाद येथे पार्क करण्यात आलेली कार नेटकऱ्यांच्या नजरेस पडली आणि याची चर्चा सुरु झाली. या चर्चांमध्ये अंबानींची यंदाची दिवाळी दणक्यात आहे, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

गुजरातमध्ये रिलायन्सचा तळ.... (Gujrat reliance)
भारतातील सर्वात मोठी रिफायनरी गुजरातमधील जामनगरमध्ये (jamnagar) आहे, थोडक्यात गुजरातमध्ये रिलायन्स उद्योग समूहाचा मोठा तळ आहे. याच धर्तीवर ही लक्झरी कार, या प्रकल्पातील अधिकारी, सन्माननीय व्यक्तींच्या प्रवासासाठी तिथं ठेवण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा अंबानी कुटुंबीय त्या भागात जातील तेव्हा त्यांच्याकडूनही ही कार वापरली जाणार आहे. 

नव्या दोन रोल्स रॉयससह (Rolls Royces) आता अंबानींच्या ताफ्यात या कंपनीच्या 3 कार झाल्या आहेत. मुंबईत या कारच्या बेस मॉडेलची किंमत 13.5 कोटी रुपये इतकी आहे. या कारमध्ये कस्टमाईज मॉडेल्सही उपलब्ध आहेत. त्यातच अंबानींच्या कारची ठेवण पाहता, त्यांच्याकडे असणाऱ्या कार्सची किंमत याहीपेक्षा जास्त असेल यात शंका नाही.