Debit आणि ATM कार्डमधील फरक तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या माहिती

अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे एटीएम आणि डेबिट हे एकच आहेत की, नाहीत?

Updated: Jul 18, 2022, 08:23 PM IST
Debit आणि ATM कार्डमधील फरक तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या माहिती title=

मुंबई : आजच्या डिजिटल युगात सर्व काही ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे बँकेशी संबंधीत बरीच कामं सोपी आणि वेळेत होऊ लागली, ज्यामुळे आपला वेळ देखील वाचला आहे. पूर्वी जे काम करण्यासाठी आपल्याला तासनतास रांगेत उभे राहुन घालवायला लागाचे ते काम आता घराच्याघरी हातांच्या बोटांवर होऊ लागले आहेत. आता हेच बघा ना नेट बँकिंग, गुगलपे ने आपलं काम किती सोप केलं आहे. आपण यामुळे कुठेही, कधीही आणि कोणालाही पैसे पाठवू शकतो. खरंतर बँकेच्य डिजीटायजेशनची सुरुवात एटीएम कार्डपासून झाली. ज्यामुळे आपण कोणत्याही वेळेला बँकेतून पैसे काढू शकतो आणि त्यासाठी बँकेत जाण्याची देखील तुम्हाला गरज नाही.

परंतु लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे एटीएम आणि डेबिट हे एकच आहेत की, नाहीत? तसे पाहाते ही दोन्ही कार्ड नक्कीच सारखी दिसतात, पण हे लक्षात घ्या की, त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचाच अर्थ असा की, या दोन्ही कार्डमुळे पैसे निघत असले, तरी हे कार्ड आणि त्यांचे कार्य वेगळे आहेत.

एटीएम कार्ड आणि डेबिटकार्डमधील फरक

जर तुमच्या बँकेने तुम्हाला एटीएम कार्ड दिले असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे कार्ड फक्त बँक शाखेच्या ऑटोमॅटिक टेलर मशीनमध्ये (एटीएम मशीन) वापरता येते. तुम्ही एटीएम मशीन नसलेल्या ठिकाणी असाल, तर या कार्डचा तुम्हाला काही उपयोग नाही. कारण याद्वारे तुम्ही स्वॅप मशीनद्वारे पैसे भरू किंवा काढू शकत नाही.

तथापि, एटीएम कार्ड तुमच्या चालू खाते किंवा बचत खात्याशी जोडलेले आहे. मात्र यावर बँक आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देत नाही. याशिवाय ऑनलाइन शॉपिंग किंवा दुकान किंवा शोरूममध्ये पैसे भरायचे असले तरी ते स्वॅप मशीनमध्ये वापरता येत नाही.

तेच डेबिट कार्डबद्दल बोलायचे झाले तर त्याचे फायदे असंख्य आहेत. आज, लोक अन्नापासून कपड्यांपर्यंत किंवा घरच्या रेशनपासून इतर कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत डेबिट कार्ड तुमची प्रत्येक गरज पूर्ण करते.

डेबिट कार्डद्वारे तुम्ही फक्त एटीएम मशिनमधूनच पैसे काढू शकत नाही, तर मशिन नसलेल्या आणि इतर ऑनलाइन पेमेंट पर्याय असलेल्या कोणत्याही ठिकाणीही पैसे काढू शकता. तुम्ही स्वॅप मशीनद्वारे किंवा नेट बँकिंग आणि वॉलेटद्वारे सहज पेमेंट करू शकता.

डेबिट कार्डमुळे सर्वसामान्यांसाठी बँकिंग सेवा खूप सोपी झाली आहे. ऑनलाइन व्यवहार असो किंवा बिल पेमेंट असो, ते सर्वांसाठी वापरले जाऊ शकते.

बँकेने ग्राहकांना दिलेल्या डेबिट कार्डवर मास्टरकार्ड, रुपे किंवा व्हिसा यांचा लोगो असतो. हे प्रत्यक्षात पेमेंट गेटवे कंपन्यांचे लोगो आहेत, जे तुमचे पेमेंट जलद आणि त्रासमुक्त करतात.

चला डेबिट कार्डचे आणखी फायदे समजून घेऊ

-तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता.
-तुम्ही कुठेही आणि केव्हाही पैशांचा व्यवहार करू शकता.
-ऑनलाइन खरेदी करा आणि स्टोअरमध्ये स्वॅप करुन पैसे द्या.
-तुम्ही तुमच्या कार्डवरून नेट बँकिंगद्वारे कोणत्याही खात्यात पैसे पाठवू शकता.